तासगाव तालुक्यात सोमवारअखेर ९७ अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:27 IST2020-12-29T04:27:08+5:302020-12-29T04:27:08+5:30
३९ ग्रामपंचायतींच्या १४५ प्रभागांतील ३९१ सदस्य निवडण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया बुधवारी सुरु झाली आहे. पहिल्या दिवशी एकही ...

तासगाव तालुक्यात सोमवारअखेर ९७ अर्ज दाखल
३९ ग्रामपंचायतींच्या १४५ प्रभागांतील ३९१ सदस्य निवडण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया बुधवारी सुरु झाली आहे. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. दुसऱ्या दिवशी गुरुवारी पाच गावांतून १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी सुटी होती. सोमवारी ८४ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. तालुक्यात ३९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी फक्त दोनच दिवस शिल्लक आहेत, पण अद्यापही ३९ पैकी २१ गावांतून एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही.
चौकट
सोमवारअखेर दाखल झालेले गावनिहाय अर्ज...
हातनोली (१२), जुळेवाडी (६), कवठेएकंद (१०), विसापूर (१), येळावी (२), धोंडेवाडी (२), धुळगाव (१०), हातनूर (१), मांजर्डे (५), नरसेवाडी (७), पाडळी (२), दहीवडी (१४), गव्हाण (६), जरंडी (५), पेड (६), सावळज (५), वडगाव (२), वाघापूर (१).