जिद्दीच्या जोरावर ९५ वर्षाच्या आजीची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:28 IST2021-05-07T04:28:03+5:302021-05-07T04:28:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कुपवाड : शहरातील शिवशक्तीनगरमधील ९५ वर्षाच्या मुक्ताबाई रामचंद्र कारंडे यांच्यावर खासगी कोविड रुग्णालयांनी उपचारास असमर्थता दर्शविली, ...

The 95-year-old grandmother overcame Corona due to her stubbornness | जिद्दीच्या जोरावर ९५ वर्षाच्या आजीची कोरोनावर मात

जिद्दीच्या जोरावर ९५ वर्षाच्या आजीची कोरोनावर मात

लोकमत न्यूज नेटवर्क

कुपवाड : शहरातील शिवशक्तीनगरमधील ९५ वर्षाच्या मुक्ताबाई रामचंद्र कारंडे यांच्यावर खासगी कोविड रुग्णालयांनी उपचारास असमर्थता दर्शविली, तर महापालिकेच्या डॉक्टरांनी बेड शिल्लक नसल्याने गृह अलगीकरणात उपचाराची तयारी दर्शविली. मग आजींनी जिद्द आणि सकारात्मकता दाखवून वेळेवर आहार आणि औषधोपचार घेतल्याने कोराेनावर विजय मिळविला.

मुक्ताबाई कारंडे यांचे मूळ गाव खानापूर तालुक्यातील भांबर्डे. त्या शिवशक्तीनगर येथे मुलीकडे उपचारासाठी राहतात. विट्याला मासिक पेन्शन आणण्यासाठी गेल्यावर त्या स्वत:च्या कोरोनाबाधित मुलाच्या संपर्कात आल्या होत्या. त्यांनाही कोरोनाची लागण झाली. नातेवाईकांनी उपचारासाठी त्यांना सांगलीला आणले.

प्रारंभी त्यांना महापालिकेच्या रुग्णालयात नेले. तेथे बेड शिल्लक नसल्याने खासगी रुग्णालयात पळापळ सुरू केली. तेथे ऑक्सिजन पातळी कमी असल्याने आणि प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर उपचार करण्यास असमर्थता दाखवण्यात आली. त्यानंतर नातेवाईकांनी महापालिकेच्या डॉक्टरांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी गृह अलगीकरण केल्यास उपचार करण्याची तयारी दर्शविली. महापालिकेचे कुपवाड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर औंधकर, डॉ. अंजली धुमाळ यांच्यासह वैद्यकीय पथकाकडून घरीच वेळेवर औषधोपचार मिळाले. महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी दररोज तपासणी करून आधार दिला. नातेवाईकांनीही योग्य काळजी घेतल्यामुळे कारंडे आजींनी बुधवारी कोरोना आजारावर मात केली.

कोट

लवकर उपचार घेतल्यास कोरोनावर निश्चित मात करता येते. दुसऱ्या लाटेमध्ये बरे होण्याचे प्रमाण चांगले असून गृह अलगीकरणातील अनेक रूग्ण योग्य उपचार घेऊन बरे होत आहेत.

- डॉ. मयूर औंधकर, महापालिका वैद्यकीय अधिकारी, कुपवाड.

कोट

कोरोना आजार बरा होणारा आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन उपचार करून घ्यावेत. संसर्ग रोखण्यासाठी घरीच थांबून प्रशासनास सहकार्य करावे.

- नीरज उबाळे, सहायक पोलीस निरीक्षक, कुपवाड पोलीस ठाणे.

Web Title: The 95-year-old grandmother overcame Corona due to her stubbornness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.