बिनकामी ९५ टक्के संस्थांचे ‘पॅकअप्’ होणार

By Admin | Updated: November 28, 2015 00:17 IST2015-11-27T23:48:06+5:302015-11-28T00:17:30+5:30

तयारी सुरू : एकूण सहकारी संस्थांपैकी १९ टक्के संस्था बोगस

95 percent of the banking institutions will get 'packed' | बिनकामी ९५ टक्के संस्थांचे ‘पॅकअप्’ होणार

बिनकामी ९५ टक्के संस्थांचे ‘पॅकअप्’ होणार

सांगली : जिल्ह्यातील एकूण ४0८९ सहकारी संस्थांपैकी १९ टक्के म्हणजे ७५९ संस्था बिनकामी निघाल्या आहेत. अंतरिम नोटिसा बजावलेल्या एकूण संस्थांपैकी जवळपास ९५ टक्के संस्थांचे ‘पॅकअप्’ निश्चित मानले जात आहे. अवसायनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचल्याने आता काही संस्थांची अस्तित्वासाठी धडपड सुरू झाली आहे.
सांगली जिल्ह्यातील सहकाराचे जाळे मोठे असले तरी, यातील अनेक संस्था केवळ कागदोपत्री अस्तित्वात होत्या. राज्यातील तपासणी मोहिमेत जवळपास लाखाच्या घरात संस्था बोगस आढळून आल्या. सांगली जिल्ह्यातील चार हजारावर संस्थांची तपासणी केल्यानंतर, त्यातील १९ टक्के संस्था केवळ कागदोपत्री जिवंत असल्याचे दिसून आले. आता या सर्व संस्थांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांना अंतिम नोटिसा बजावण्यात येणार आहेत. त्यापूर्वी अंतरिम नोटिसांवरील सुनावणी ८ डिसेंबर रोजी जिल्हा उपनिबंधकांकडे होणार आहे. यावेळी काही संस्थांना आपल्या अडचणी मांडण्याची तसेच कागदपत्रे सादर करून मुदत मागण्याची संधी मिळू शकते. शासकीय अनुदान किंवा शासनाकडून काही गोष्टींची पूर्तता न झाल्याने कागदोपत्री अस्तित्वात असलेल्या संस्थांना संधी मिळू शकते. मात्र अशा संस्थांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे नोटिसा बजावलेल्या एकूण संस्थांपैकी ९५ टक्के संस्था अवसायनात निघण्याची शक्यता आहे. डिसेंबरअखेर ही प्रक्रिया चालणार आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अवसायनात निघणाऱ्या संस्थांची यादी जाहीर होणार आहे.
सांगली जिल्ह्यातील संस्थांची संख्या आणखी घटणार आहे. यापूर्वी अनेक पतसंस्था, बँका, सूतगिरण्या अवसायनात काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे यापूर्वीच सहकारी संस्थांची संख्या घटली होती. आता पुन्हा कागदोपत्री अस्तित्वात असणाऱ्या संस्थांनाही अवसायनात काढण्यात येणार आहे. अशा संस्था बंद करून उर्वरित संस्थांच्या गुणात्मक वाढीकडे लक्ष देण्याच्यादृष्टीने ही मोहीम सहकार विभागाने हाती घेतली आहे. या मोहिमेत ज्या सहकारी संस्था नोंदणीकृत पत्त्यावर आढळून येणार नाहीत किंवा ज्यांचा कोणताही ठावठिकाणा नाही, त्यांच्यासंदर्भात जाहीर प्रकटन प्रसिद्ध करून त्या संस्था बंद असल्याबाबतची खातरजमा करण्यात आली.
पूर्णपणे बंद असलेल्या व कार्यस्थगित संस्था अवसायनात घेण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जिल्हा उपनिबंधकांनी यापूर्वीच दिल्या आहेत. (प्रतिनिधी)


सर्वेक्षण अहवालानुसार जिल्ह्यातील सहकारी संस्थांची स्थिती
तालुकाएकूण चालू बंदबिनकामीगायबबंद होणाऱ्या
मिरज १२१४८११८४२३६८३४0३
जत २४५२२९४१२——१६
कवठेमहांकाळ २१९१८८८२३——३१
पलूस३५७२८२६८७——७५
तासगाव २५५२१२३२११९४३
कडेगाव २१२१९८१४————१४
खानापूर२१0१८११५५९२९
शिराळा ३८६३३८३८——१0४८
वाळवा७७४६८४९0————९0
आटपाडी २१७२0७१0————१0
एकूण ४0८९३,३३0३३४३0४१२१७५९

Web Title: 95 percent of the banking institutions will get 'packed'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.