जिल्ह्यात ९४४ कोरोनामुक्त, तर नवे ८२० रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:34 IST2021-07-07T04:34:04+5:302021-07-07T04:34:04+5:30
सांगली : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे नवे ८२० रुग्ण आढळून आले असून, जिल्ह्यातील २४ व परजिल्ह्यातील १ अशा २५ ...

जिल्ह्यात ९४४ कोरोनामुक्त, तर नवे ८२० रुग्ण
सांगली : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे नवे ८२० रुग्ण आढळून आले असून, जिल्ह्यातील २४ व परजिल्ह्यातील १ अशा २५ जणांचा मृत्यू झाला. ९४४ जणांनी कोरोनावर मात केली, तर उपचारांखालील १०४० जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार होत आहे. मंगळवारी वाळवा तालुक्यात सर्वाधिक १९१ रुग्ण आढळून आले. तर सर्वात कमी २० रुग्ण कवठेमहांकाळमध्ये सापडले. आटपाडी तालुक्यात ३९, जत २९, कडेगाव ५९, खानापूर ५१, मिरज ९७, पलूस ५६, शिराळा ५८, तासगाव ६६; तर महापालिका क्षेत्रात सांगलीत ११३, मिरजेत ४१ असे १५४ रुग्ण आढळून आले. जिल्ह्याबाहेरील सोलापूर, कोल्हापूर, सातारा, मुंबई, पुणे जिल्ह्यातील ९ रुग्णही उपचारांसाठी दाखल झाले आहेत.
दिवसभरात जिल्ह्यातील २४ जणांचा मृत्यू झाला. त्यात आटपाडी, कडेगाव, पलूस, जत, खानापूर तालुक्यातील प्रत्येकी १, मिरज ९, वाळवा तालुक्यातील ५; तर महापालिका क्षेत्रात सांगलीतील तीन रुग्णांचा समावेश आहे. तर कर्नाटकातील एकाचा कोरोनाने बळी घेतला.
सध्या १०४० रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे, तर जिल्ह्यातील ९४४ व जिल्ह्याबाहेरील १५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. एकूण आरटीपीसीआरच्या २२३४ चाचण्यांत १४४ पाॅझिटिव्ह, तर अँटिजनच्या ९४३४ चाचण्यांत ६८५ रुग्ण सापडले.
चौकट
आतापर्यंतचे बाधित : १,५१,७५७
कोरोनामुक्त झालेले : १,३७,७५८
आतापर्यंतचे मृत्यू : ४१८६
चौकट
मंगळवारी दिवसभरात...
सांगली : ११३
मिरज : ४१
आटपाडी : ३९
जत : २९
कडेगाव : ५९
कवठेमहांकाळ : २०
खानापूर : ५१
मिरज : ९७
पलूस : ५६
शिराळा : ५८
तासगाव : ६६
वाळवा : १९१