९३ वर्षांच्या आजीने केली कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:28 IST2021-07-30T04:28:24+5:302021-07-30T04:28:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कवठे एकंद : येथील अनुसया शामराव डांगे या ९३ वर्षांच्या आजीने घरातच औषधोपचार घेऊन कोरोनावर यशस्वी ...

93-year-old grandmother defeated Kelly Corona | ९३ वर्षांच्या आजीने केली कोरोनावर मात

९३ वर्षांच्या आजीने केली कोरोनावर मात

लोकमत न्यूज नेटवर्क

कवठे एकंद : येथील अनुसया शामराव डांगे या ९३ वर्षांच्या आजीने घरातच औषधोपचार घेऊन कोरोनावर यशस्वी मात केली. आजवर केलेले कष्ट, संघर्षामुळे मानसिकदृष्ट्या खंबीर राहिले. त्यामुळेच कोरोनावर मात करता आली, असे त्या म्हणाल्या.

५ जुलै रोजी नातू व सून तसेच अनुसया डांगे पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यांना दहा वर्षांपासून मधुमेह, रक्तदाबाचा त्रास होता. असे असतानाही डॉक्टरांच्या सल्ल्याने मुलगा अशोक डांगे व सून वैशाली डांगे यांनी घरीच औषध उपचार घेण्याची जबाबदारी स्वीकारली. योग्य काळजी घेत त्यांच्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार व घरगुती उपाय करून कोरोनामुक्त झाले.

कोरोना परिस्थितीत सुशिक्षित माणूसही घाबरून गेला आहे. अशा परिस्थितीत नव्वदी ओलांडलेल्या अनुसया डांगे यांनी कोरोनावर मात करून समाजापुढे हिमतीचा धडा ठेवला आहे. याबद्दल बळीराजा पार्टीचे सांगली जिल्हा संपर्क प्रमुख शशिकांत डांगे यानी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. डांगे यांच्या जगण्यातील संघर्षामुळेच त्यांनी कोरोनावरही यशस्वी मात केली आहे.

Web Title: 93-year-old grandmother defeated Kelly Corona