शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

LokSabha2024: सांगली जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर ९,१६० मतदान यंत्रे पोच

By अशोक डोंबाळे | Updated: May 6, 2024 17:57 IST

छुप्या प्रचारावर भरारी पथकाचा वॉच

सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीसाठी उद्या मंगळवार, दि. ७ मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. हे मतदान सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत असणार आहे. मतदानाची बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट मशीन्स असे नऊ हजार १६० यंत्रे मतदान केंद्रावर एसटी बसेसने पोच केली आहेत. आठ हजार ५२ कर्मचाऱ्यांची मतदानासाठी नियुक्ती केली आहेत.सांगली लोकसभा मतदारसंघासाठी चार हजार ३७५ बॅलेट युनिट, दोन हजार ३०४ कंट्रोल युनिट, तर दोन हजार ४८१ व्हीव्हीपॅट मशीन्स आहेत. मतदान यंत्रे आणि आठ हजार ५२ कर्मचाऱ्यांना घेऊन २९२ बसेस मिरज, सांगली, पलूस-कडेगाव, खानापूर, तासगाव-कवठेमहांकाळ, जत या सहा विधानसभा मतदारसंघात सोमवारी सकाळीच रवाना झाल्या आहेत. आज, सोमवारी सकाळपासूनच सांगलीतील तरुण भारत मैदानावर व मिरजेतील शासकीय गोदामातून लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर मतपेट्या वाटप करण्याचे काम सुरू आहे. मतपेट्या गावोगावी पोहोच करण्यासाठी एसटी बसेसची मदत घेण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्राच्या मतदान अधिकारी यांच्या हातात मतपेट्या, बॅलेट युनिट व आवश्यक ते साहित्य देण्यात आले. पोलिस बंदोबस्तात हे साहित्य मतदान केंद्रावर पोहोच केले आहे.

असे आहेत मतदारसांगली लोकसभेसाठी १८ लाख ६८ हजार १७४ मतदारसंख्या असून, यामध्ये पुरुष नऊ लाख ५३ हजार ७८५, तर महिला नऊ लाख १५ हजार २६ आणि तृतीयपंथीय १२४ मतदार आहेत. प्रशासनाने ७५ टक्केपर्यंत मतदान करण्याचे उद्दिष्ठ ठेवले आहे.छुप्या प्रचारावर ६८ भरारी पथकाचा वॉचजिल्ह्यातील मतदान केंद्र आणि मतदान होण्यापूर्वी व्हिडीओ चित्रीकरण टीमसह ६८ भरारी पथके प्रशासनाने नियुक्त केले आहेत. मतदान होण्यापूर्वी एक दिवस प्रचार यंत्रणा थांबली असतानाही वेगवान घडामोडी होत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही आर्थिक गैरव्यवहार होऊ नयेत, म्हणून ६८ भरारी पथकांचा वॉच असणार आहे.

प्रशासनाकडून नियोजनविधानसभा मतदारसंघ - मतदान केंद्र संख्या - कर्मचारी संख्यामिरज - ३०९  - १३६०सांगली  - ३०८  -   १३५५पलूस-कडेगाव - २८५ -  १२५४खानापूर  - ३४८ - १५३१तासगाव-क. महांकाळ - २९९  -  १३१६जत -  २८१  - १२३६

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४