सांगलीत राजापुरी हळदीला ९०५० रुपये दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:18 IST2021-07-08T04:18:29+5:302021-07-08T04:18:29+5:30
सांगली : मार्च, एप्रिल महिन्यांत राजापुरी हळदीचे दर प्रति क्विंटल २० हजारांवर गेला होता. परंतु, या आठवड्यात हळदीचे दर ...

सांगलीत राजापुरी हळदीला ९०५० रुपये दर
सांगली : मार्च, एप्रिल महिन्यांत राजापुरी हळदीचे दर प्रति क्विंटल २० हजारांवर गेला होता. परंतु, या आठवड्यात हळदीचे दर कमी झाले आहेत. सांगली मार्केट यार्डात बुधवारी दोन हजार ८३४ क्विंटल हळदीची आवक झाली होती. चांगल्या दर्जाच्या हळदीला प्रति क्विंटल नऊ हजार ५० रुपये दर मिळाला आहे.
सांगली मार्केट यार्डात आजअखेर सात लाख १० हजार ३८९ क्विंटल हळदीची आवक झाली होती. हळदीला प्रति क्विंटल पाच हजार ५०० रुपये ते नऊ हजार ५० रुपये दर मिळाला आहे. सरासरी सात हजार २७५ क्विंटल दर मिळाला आहे. हळदीच्या दरात घट झाल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार मागणी कमी आणि हलक्या दर्जाची हळद येत असल्यामुळे दर कमी असल्याचे मत आहे.