शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
3
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
4
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
5
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
6
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
7
"तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
8
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
9
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
10
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
11
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
12
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
13
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
14
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
15
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
16
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
17
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
18
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
19
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
20
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’

90 वर्षाच्या ऐतिहासिक ‘आयर्विन’शेजारी सांगलीत बांधणार नवा पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:19 IST

कृष्णा नदीवरील ९० वर्षांच्या ऐतिहासिक आयर्विन पुलाला पर्यायी पूल उभारण्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने गती दिली आहे. पांजरपोळ व टिळक चौक या दोन्ही ठिकाणाहून पर्यायी पूल जोडला जाणार

ठळक मुद्देआराखडा तयार : तांत्रिक मान्यतेनंतर पुढील आठवड्यात निविदापांजरपोळ व टिळक चौक येथून पर्यायी पूल जोडला जाणार

सांगली : कृष्णा नदीवरील ९० वर्षांच्या ऐतिहासिक आयर्विन पुलाला पर्यायी पूल उभारण्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने गती दिली आहे. पांजरपोळ व टिळक चौक या दोन्ही ठिकाणाहून पर्यायी पूल जोडला जाणार आहे. तसा आराखडा अंतिम करण्यात आला असून, पुढील आठवड्यात तांत्रिक मान्यतेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुणे प्रादेशिक कार्यालयाकडे पाठविला जाणार आहे. मान्यता मिळताच पुलाच्या कामाची निविदा प्रक्रिया राबविली जाणार असून हा नवा पूल तीनपदरी आहे.

सांगलीत १९१४ व १९१६ मध्ये कृष्णा नदीला महापूर आला होता. तत्कालीन सांगली संस्थानचे राजे चिंतामणराव पटवर्धन दुसरे यांनी येथे नदीवर पूल उभारण्यासाठी पुढाकार घेतला. १९२७ मध्ये पुलाचे काम सुरू झाले. दोन वर्षांनी म्हणजे १९२९ मध्ये या पुलाचे काम पूर्ण करण्यात आले. तत्कालीन व्हाईसरॉय आयर्विन यांच्याहस्ते या पुलाचे उद््घाटन करून पुलाला त्यांचेच नाव देण्यात आले. तेव्हापासून तब्बल ९० वर्षे हा पूल सांगलीच्या प्रगतीचा साक्षीदार ठरला आहे. या पुलाची मुदत संपल्याने पर्यायी पुलाची मागणी होऊ लागली. काही वर्षांपूर्वी या पुलास पर्याय म्हणून बायपास रस्त्यावर पूल बांधण्यात आला. पण शहरापासून तो लांब असल्याने आयर्विनशेजारीच नव्या पुलाची मागणी होऊ लागली.

महाडमधील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेमुळे, आयर्विन पुलाची कमजोरी आणि त्याला पर्यायी पुलाची गरज समोर आली. त्यानुसार आयर्विन पुलाचेही आॅडिट झाले. हा पूल अजूनही मजबूत असला तरी, त्याची कालमर्यादा संपली आहे. त्यामुळे पुन्हा पर्यायी पुलाच्या मागणीला जोर आला. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी राज्य शासनाच्या अर्थसंकल्पावेळी हा मुद्दा लावून धरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केला. अखेर राज्याच्या अर्थसंकल्पात नव्या पर्यायी पुलाच्या २५ कोटीच्या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवित यंदाच्या अंदाजपत्रकात दोन कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

मेन रोड-कापड पेठमार्गे पांजरपोळसमोरून सांगलीवाडीतील चिंचेच्या बनापर्यंत हा पूल उभारण्याची चाचपणी करण्यात आली. दोन्ही बाजूला सरकारी जागा आहे. त्यामुळे जागा हस्तांतरणाचीही कोणतीच अडचण नाही. त्याजवळूनच टिळक चौकमार्गे महापालिकेकडे जाणारा मार्ग एकेरी आहे. मेन रोड-कापड पेठ रस्ताही एकेरी असल्याने वाहतुकीचा ताण कमीच राहील, असा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले.

त्यानुसार मुंबईतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डिझाईन सर्कल तज्ज्ञांनी पाहणी करून अंतिम आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर केला आहे. हा आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोल्हापूर विभागाकडे सादर केला जाणार आहे. तेथून तो पुणे प्रादेशिक विभागाकडे जाईल. पुढील आठवड्यात पुलाच्या कामाला तांत्रिक मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे, असे सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता एस. एच. मुजावर यांनी सांगितले.वाय टाईप रस्ता होणारआयर्विन पुलाजवळूनच १० मीटर अंतर सोडून पर्यायी पूल उभारला जाणार आहे. या नव्या पुलावर जाण्यासाठी टिळक चौक व पांजरपोळ या दोन्ही ठिकाणी वाय टाईप रस्ता ठेवला आहे. पुलाची उंची आयर्विनइतकीच असून लांबी २00 मीटर आहे. तसेच पुलाच्या दोन्ही बाजूला २०० मीटरचा रस्ता असेल. हा पूल तीनपदरी करण्यात आला आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. एच. मुजावर यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीriverनदीroad safetyरस्ते सुरक्षा