जिल्ह्यात ९ नवे रुग्ण; १४ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:33 IST2021-02-17T04:33:16+5:302021-02-17T04:33:16+5:30

सांगली : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात नवे ९ कोरोना रुग्ण आढळून आले, तर १४ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या ११७ ...

9 new patients in the district; 14 corona free | जिल्ह्यात ९ नवे रुग्ण; १४ जण कोरोनामुक्त

जिल्ह्यात ९ नवे रुग्ण; १४ जण कोरोनामुक्त

सांगली : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात नवे ९ कोरोना रुग्ण आढळून आले, तर १४ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या ११७ रुग्ण उपचाराखाली असून, त्यातील २७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

महापालिका क्षेत्रात मंग‌ळवारी सांगलीत ४, तर मिरजेत १ रुग्णाची नोंद झाली. खानापूर व कडेगाव तालुक्यात प्रत्येकी एक, तर जत तालुक्यात २ दोन रुग्ण आढळून आले. आटपाडी, कवठेमहांकाळ, पलूस, तासगाव, मिरज, शिराळा, वाळवा या सहा तालुक्यांत एकही रुग्ण आढळला नाही.

दिवसभरात आरटीपीसीआरच्या १६४ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले. अँटिजेनच्या ५९३ चाचण्यांत ६ रुग्ण सापडले. सध्या २७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात ऑक्सिजनवर २२, हाय फ्लो नेझल ऑक्सिजनवर १, तर नाॅन इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर ४ रुग्ण आहेत. तर परजिल्ह्यातील १० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Web Title: 9 new patients in the district; 14 corona free