राजारामबापू पतसंस्थेला ८९ लाख नफा : रघुनाथ जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:28 IST2021-04-09T04:28:51+5:302021-04-09T04:28:51+5:30

आष्टा : येथील राजाराम बापू पाटील नागरी सहकारी पतसंस्थेला ३१ मार्च अखेर ८९ लाख रुपये ढोबळ नफा झाला असून ...

89 lakh profit for Rajarambapu Patsanstha: Raghunath Jadhav | राजारामबापू पतसंस्थेला ८९ लाख नफा : रघुनाथ जाधव

राजारामबापू पतसंस्थेला ८९ लाख नफा : रघुनाथ जाधव

आष्टा :

येथील राजाराम बापू पाटील नागरी सहकारी पतसंस्थेला ३१ मार्च अखेर ८९ लाख रुपये ढोबळ नफा झाला असून ९७ टक्के कर्ज वसुली झाले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रघुनाथराव जाधव यांनी दिली.

ते म्हणाले आष्टा शहरातील सर्वसामान्य गोरगरीब होतकरू युवकांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी संस्थेने पावले उचलली आहेत. संस्थेचे भागभांडवल १ कोटी १५ लाख, निधी ३ कोटी ४७ लाख, ठेवी २५ कोटी ५५ लाख, कर्ज १९ कोटी ३० लाख, गुंतवणूक १२ कोटी, ढोबळ नफा ८९ लाख, नेट एनपीए शून्य टक्के आहे.

उपाध्यक्ष भाग्यश्री थोरात, यशवंत कुलकर्णी, एन.डी. कुलकर्णी, मुकुंद इंगळे, संग्राम जाधव, जयवंतराव फडतरे, अनिल रुकडे, आनंदा ढोले, प्रदीप तांबवेकर, डॉ. प्रवीण वंजाळे, सूर्यकांत जुगदर, रामदास साठे, सुमन कुशिरे, सचिव विजय शिंदे यांचे सहकार्य लाभले.

Web Title: 89 lakh profit for Rajarambapu Patsanstha: Raghunath Jadhav