शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सांगली-पेठ रस्त्याच्या चौपदरीकरणाचे शुक्लकाष्ठ संपले, ८८१ कोटी मंजूर; ‘ईपीसी’ मोड तत्त्वावर निविदा प्रसिद्ध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 12:07 IST

हा रस्ता ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी)प्रमाणे नसेल. शासनाच्या निधीतून काम पूर्ण केले जाणार

सांगली : सांगली-पेठ रस्त्याच्या चौपदरीकरणामागील शुक्लकाष्ठ अखेर मंगळवारी संपुष्टात आले. दिल्लीत अर्थ समितीच्या बैठकीच्या या रस्त्याच्या कामासाठी ८८१.८७ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्वीट करीत ही माहिती दिली. ईपीसी मोड तत्त्वावर रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार आहे.वाहनांची वाढती गर्दी, अपघातांचे वाढलेले प्रमाण, खड्ड्यांचे साम्राज्य यामुळे ४१ किलोमीटरचा सांगली-पेठ रस्ता नेहमीच चर्चेत राहिला आहे. चौपदरीकरणासाठी सहा वर्षांपासून लढा सुरू आहे. सांगलीत सर्वपक्षीय कृती समितीने आंदोलन केले. त्यानंतर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला. प्राधिकरणाने चौपदरीकरणाचा आराखडा तयार करून केंद्राला सादर केला. शासनाने कामाला तत्त्वत: मंजुरीही दिली.दोन महिन्यांपूर्वी रस्त्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली; पण अर्थ समितीची मान्यता नसल्याने ठेकेदारांनी निविदा भरण्याबाबत सावध भूमिका घेतली. पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ व जयंत पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून मान्यता देण्याचा आग्रह धरला होता. अखेर मंगळवारी दिल्लीत ८८१ कोटी ८७ लाख रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली.

ईपीसी मोड म्हणजे काय?सांगली-पेठ रस्त्यासाठी ‘ईपीसी’ मोड तत्त्वावर निविदा प्रसिद्ध केली आहे. यानुसार ठेकेदाराला अभियांत्रिकी आराखडे तयार करणे, साहित्य खरेदी, देखरेख आणि बांधकाम अशा सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. मंजूर निधीमध्येच काम पूर्ण करावे लागेल. कामावर वाढीव खर्च होणार नाही. रस्ता गुणवत्तापूर्ण होण्यास मदत होईल. दिलेल्या मुदतीत रस्ता पूर्ण करावा लागेल. अन्यथा आर्थिक दंडही होऊ शकतो.

शासनाकडून टोल वसुलीहा रस्ता ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी)प्रमाणे नसेल. शासनाच्या निधीतून काम पूर्ण केले जाणार आहे. त्यातही वेळेची मर्यादा निश्चित आहे. त्यामुळे कमी कालावधीचा आणि रकमेचा टोल लागू शकेल. महामार्ग प्राधिकरणच टोल रक्कम आणि कालावधी निश्चित करणार आहे. आराखड्यात कसबे डिग्रजजवळ टोल नाका प्रस्तावित केला आहे.

असा असेल रस्तासांगली ते पेठ हा ४१.२५ किलोमीटरचा संपूर्ण रस्ता काँक्रिटचा असेल. सांगलीवाडी टोल नाक्यापर्यंत चौपदरीकरण होणार आहे. रस्ता दोन्हीकडे प्रत्येकी साडेसात मीटर रुंदीचा आहे. मधोमध ०.६० मीटरचा दुभाजक आहे. दहा ठिकाणी लहान-मोठे पूल आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीroad transportरस्ते वाहतूकhighwayमहामार्गCentral Governmentकेंद्र सरकार