प्रवासी नसल्यामुळे एसटीच्या ८८ फेऱ्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:25 IST2021-04-06T04:25:20+5:302021-04-06T04:25:20+5:30
सांगली : जिल्ह्यासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे एसटीकडे प्रवाशांची संख्या ६० ते ७० टक्क्यांनी घटली आहे. यामुळे ...

प्रवासी नसल्यामुळे एसटीच्या ८८ फेऱ्या रद्द
सांगली : जिल्ह्यासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे एसटीकडे प्रवाशांची संख्या ६० ते ७० टक्क्यांनी घटली आहे. यामुळे जिल्ह्यातील दहा आगारांतील एसटीच्या ८८ फेऱ्या आणि २५ हजार ३२९ किलोमीटर अंतर कमी केले आहे, अशी माहिती सांगली विभागाचे विभाग नियंत्रक अरुण वाघाटे यांनी दिली.
कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे नागरिकांनी प्रवास कमी केला आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, बीड, उस्मानाबाद या मार्गावर धावणाऱ्या बसेसना प्रवासीच नाहीत. या मार्गावरील बसला नेहमी प्रवाशांची गर्दी होती. गेल्या आठवड्यापासून या मार्गावरील बसेसला ६० ते ७० टक्के प्रवासी कमी झाले आहेत. ३० ते ३५ टक्के प्रवाशांवर लांब पल्ल्याच्या मार्गावर बसेस सोडणे परवडत नाही. यामुळे लांब पल्ल्यासह जिल्ह्यातील ८८ एसटी बसच्या फेऱ्या सोमवार, दि. ५ एप्रिलपासून बंद केल्या आहेत. तसेच विविध मार्गांवरील प्रवासी संख्या कमी असल्यामुळे २५ हजार ३२९ किलोमीटर अंतर बसेसचे कमी केले आहे. यामुळे एसटीचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे; पण कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे अडचणी वाढल्याचेही अरुण वाघाटे म्हणाले.
चौकट
आगारनिहाय रद्द फेऱ्या
आगार रद्द फेऱ्यांची संख्या रद्द किलोमीटर
सांगली ५ १५४९
मिरज १५ ३१६३
इस्लामपूर ११ ३४८९
तासगाव १४ ३७७५
विटा १५ ४११४
जत ५ १९२५
आटपाडी ६ १८६७
क.महांकाळ ९ ३०४६
शिराळा ३ १०५७
पलूस ३ १०५६
सांगली शहरी बस २२७
मिरज शहरी बस ६१
एकूण ८८ २५३२९