कसबे डिग्रजला ८७ वर्षीय आजींची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:27 IST2021-05-18T04:27:19+5:302021-05-18T04:27:19+5:30

फोटो ओळ : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील सयुबाई राजमाने यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केल्याने त्यांचा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार ...

The 87-year-old grandmother defeated Kasbe Digraj at Corona | कसबे डिग्रजला ८७ वर्षीय आजींची कोरोनावर मात

कसबे डिग्रजला ८७ वर्षीय आजींची कोरोनावर मात

फोटो ओळ : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील सयुबाई राजमाने यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केल्याने त्यांचा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.

लोकमत न्युज नेटवर्क

कसबे डिग्रज : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील सयुबाई राजमाने (वय ८७) या आजींनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली. याबद्दल त्यांना ग्रमास्थांनी शुभेच्छा दिल्या.

कसबे डिग्रज येथील सयुबाई राजमाने यांना कोरोनाची लागण झाली होती. मिरज कोविड सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. प्रबळ इच्छाशक्ती, आत्मविश्वास व जिद्दीच्या जोरावर राजमाने आजींनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली. या महिलेवर डॉ. नंदकुमार गायकवाड व डॉ. संतोष दळवी यांनी उपचार केले.

कोरोनाच्या रोगावर मोठ्या हिमतीने यशस्वी लढा देणाऱ्या सयुबाई राजमाने यांचा कसबे डिग्रज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी आनंदराव नलावडे, अरुण पवार, संजय शिंदे, संदीप निकम, निखिल तेली, सुभाष राजमाने, आदी उपस्थित होते.

Web Title: The 87-year-old grandmother defeated Kasbe Digraj at Corona