शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
5
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
6
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
7
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
8
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
9
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
10
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
11
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
12
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
13
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
14
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
15
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
16
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
17
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
18
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
19
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
20
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट

शेतकऱ्यांच्या खात्यावर ८० टक्के एफआरपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 23:57 IST

साखरेचे दर पडल्याने मागील दीड महिन्यापासून शेतकºयांना ऊसबिले मिळालेली नाहीत. साखर सहसंचालकांनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर कारखानदारांनी एफआरपीच्या ८० टक्के रक्कम पहिल्या

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांचा तोडगाप्रति टन शेतकºयांना पहिला हप्ता २२०० ते २५०० रुपये मिळणार

सांगली : साखरेचे दर पडल्याने मागील दीड महिन्यापासून शेतकºयांना ऊसबिले मिळालेली नाहीत. साखर सहसंचालकांनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर कारखानदारांनी एफआरपीच्या ८० टक्के रक्कम पहिल्या टप्प्यामध्ये शेतकºयांच्या खात्यावर गुरुवार दि. २० पासून वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व कारखानदारांनी मोबाईलद्वारे बुधवारी एकमेकांशी संपर्क करून ८०:१०:१० फॉर्म्युल्यावर तोडगा काढला आहे. एफआरपीच्या ८० टक्केनुसार २२०० ते २५०० रुपयांपर्यंतची रक्कम प्रति टन पहिल्या हप्त्यानुसार शेतकºयांना मिळेल.

जिल्ह्यात साखर कारखान्यांचे गाळप सुरु होऊन दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी पूर्ण झाला आहे. साखरेचे दर पडल्याचे कारण पुढे करीत एकाही साखर कारखान्याने अद्याप उसाचे बिल दिलेले नाही. जिल्ह्यात एफआरपीचे सुमारे ६२४ कोटी रुपये थकीत आहेत. कारखान्यांनी ऊस दर नियंत्रण कायदा १९६६ चे उल्लंघन केले आहे. या कारणांमुळे राजारामबापू साखराळे, वाटेगाव युनिट, सर्वोदय युनिट, हुतात्मा, क्रांती, सोनहिरा आणि दत्त इंडिया सांगली या कारखान्यांनी दि. ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंतची ऊसबिले दिली नसल्याने, प्रादेशिक साखर सहसंचालकांनी नोटिसा बजाविल्या होत्या.

राजारामबापू, हुतात्मा, क्रांती, सोनहिरा आणि दत्त इंडियाच्या कार्यकारी संचालकांनी साखर सहसंचालकांपुढे लेखी खुलासा सादर केला आहे. दोन दिवसात ऊसबिले देण्यास सुरुवात करावी, अन्यथा साखर आयुक्तांकडे कारवाईचा प्रस्ताव पाठविला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

म्हणूनच जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या अध्यक्षांनी मोबाईलद्वारेच एकमेकांशी संपर्क करुन, पहिल्या टप्प्यामध्ये एफआरपीच्या ८० टक्के रक्कम शेतकºयांच्या खात्यावर गुरुवार दि. २० पासून जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित २० टक्के एफआरपीचे १०:१० असे दोन टप्पे केले आहेत. हंगामाच्या सुरुवातीस साखर प्रति क्विंटल ३२०० ते ३३०० रुपये असा दर होता. म्हणून हंगाम सुरु होताना कारखानदारांनी एफआरपी एकरकमी देण्याचे जाहीर केले. मात्र कालांतराने साखरेच्या दरात घसरण सुरु झाली.

सध्या साखरेचे दर २९०० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. यामुळेच उसाची एफआरपी देण्यात कारखान्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. मागील आठवड्यात राज्य बँकेने साखरेचे मूल्यांकन तीन हजार रुपये केले आहे. बँकांकडून ८५ टक्के उचल दिली जाते, ही रक्कम सुमारे २५५० रुपये होते. यापैकी कर्जाचे पाचशे रुपये व्याजासाठी बँका कपात करुन घेत असल्यामुळे, कारखान्यांच्या हातात ऊस बिलासाठी दोन हजार रुपयेच राहतात.त्यामुळे एफआरपीतील ८० टक्के रक्कम देण्यासाठी पैशाची तरतूद कारखान्यांना करावी लागणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, उसाची एफआरपी एकरकमी देण्यासाठी सरकार मदत करेल, अशी घोषणा गळीत हंगामाच्या सुरुवातीस केली होती. परंतु, मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा पाळली नसल्यामुळे कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे केले आहेत. साखर कारखान्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन, शासनाने मदत करावी, असे साकडे घातले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत कोणतेही आश्वासन दिलेले नाही. त्यामुळे साखर कारखाने अडचणीत आले आहेत.

कारवाईचा बडगा उगारल्याने कारखानदारांनी एफआरपीच्या ८० टक्के रक्कम पहिल्या हप्त्यापोटी देण्याचा निर्णय घेतला आहे. एफआरपीची उर्वरित २० टक्के रक्कम दोन टप्प्यात देण्याचा तोडगा काढला आहे.जून २०१९ मध्ये १० टक्के आणि उर्वरित १० टक्के दिवाळीला देण्यावर कारखानदारांमध्ये एकमत झाले आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून एफआरपीच्या ८० टक्केनुसार पहिल्या टप्प्यात कारखानदारांकडून शेतकºयांच्या खात्यावर प्रति टन २२०० ते २५०० रुपये जमा होणार आहेत. गुरुवारी कारखानदार बँकांकडे शेतकºयांची यादी आणि त्यांची रक्कम जमा करणार आहेत. दोन दिवसात शेतकºयांच्या खात्यावर प्रत्यक्षात पैसे जमा होणार आहेत.आजपासून पैसे वर्ग : अरुण लाडसाखरेचे दर उतरल्यामुळे शेतकºयांना एकरक्कमी एफआरपी देण्यात साखर कारखानदारांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकरकमी एफआरपीसाठी कारखानदारांना मदत करण्याची घोषणा केली होती, म्हणून फडणवीस यांची भेट घेतली. पण, त्यांनीही आम्हाला मदत केली नसल्यामुळे मोठी आर्थिक कोंडी झाली होती. पण शासनाने झिडकारले, म्हणून शेतकºयांना कारखानदार वाºयावर सोडू शकत नाहीत. म्हणूनच एफआरपीच्या ८० टक्के रक्कम गुरुवारपासून शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय सर्वच कारखानदारांनी घेतला आहे, अशी माहिती क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी दिली.कारखान्यांकडून ८० टक्केप्रमाणे मिळणारी एफआरपी रु.कारखाना एफआरपी ८० टक्केहुतात्मा ३०६८ २४५४राजारामबापू, साखराळे २९७८ २३८२राजारामबापू, वाटेगाव २९१५ २३३२राजारामबापू, सर्वोदय २९१७ २३३३विश्वास २८२३ २२५८केन अ‍ॅग्रो २५२१ २०१६निनाईदेवी २७५० २२००मोहनराव शिंदे २५०० २०००कारखाना एफआरपी ८० टक्केसोनहिरा २८५७ २२८५क्रांती २८४७ २२७७सद्गुरु श्री श्री २५०० २०००उदगिरी २५६५ २०५२दत्त इंडिया २७१५ २१७२महांकाली २३४० १८७२(तोडणी वाहतूक वजा करुन कारखान्याची एफआरपी आहे.)

कारखान्यांकडून ८० टक्केप्रमाणे मिळणारी एफआरपी रु.कारखाना एफआरपी ८० टक्केहुतात्मा ३०६८ २४५४राजारामबापू, साखराळे २९७८ २३८२राजारामबापू, वाटेगाव २९१५ २३३२राजारामबापू, सर्वोदय २९१७ २३३३विश्वास २८२३ २२५८केन अ‍ॅग्रो २५२१ २०१६निनाईदेवी २७५० २२००मोहनराव शिंदे २५०० २०००कारखाना एफआरपी ८० टक्केसोनहिरा २८५७ २२८५क्रांती २८४७ २२७७सद्गुरु श्री श्री २५०० २०००उदगिरी २५६५ २०५२दत्त इंडिया २७१५ २१७२महांकाली २३४० १८७२(तोडणी वाहतूक वजा करुन कारखान्याची एफआरपी आहे.)

टॅग्स :FarmerशेतकरीMONEYपैसा