शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

सांगलीत आठ दुकाने फोडली

By admin | Updated: January 2, 2017 23:41 IST

मार्केड यार्डमध्ये धुमाकूळ : व्यापाऱ्यांत घबराट; मोबाईलसह २३ हजारांचा माल लंपास

सांगली : येथील मार्केट यार्डात रविवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत आठ दुकाने फोडली. मात्र, तीन दुकानांतून चोरट्यांच्या हाती केवळ २३ हजारांचा माल लागला. यामध्ये १२ हजारांची रोकड व दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल आहे. सोमवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.विक्रम जैन यांचे वर्षा सेल्स हे किराणा मालाचे दुकान, समीर शिवाणी यांचे शिवाणी एंटरप्रायझेस्, राकेश माहेश्वर यांचे आर्यन मसाला, संतोष चोप्रा यांचे जितेंद्र ट्रेडर्स, सत्यनारायण अट्टल, माजी महापौर सुरेश पाटील यांचे अडत दुकान, कऱ्हाड तालुका खरेदी-विक्री संघ, महावीर भन्सारी यांचे रामदेव ट्रेडर्स हे किराणा दुकान, अशी आठ दुकाने फोडून चोरट्यांनी विश्रामबाग पोलिसांना आव्हानदिले आहे. सर्व दुकाने फोडताना शटर्सची कुलुपे कटावणीने उचकटून आत प्रवेश केला. तोडलेली कुलुपे दुकानाबाहेर सापडली आहेत. आठ दुकाने फोडल्याची घटना घडूनही विश्रामबाग पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झालेला नव्हता. जैन यांच्या दुकानातून तीन हजाराची रोकड, शिवाणी यांच्या दुकानातून तीनशे रुपयांची चिल्लर, तर चोप्रा यांच्या दुकानातून दहा हजाराची चिल्लर व दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल, असा एकूण २३ हजार तीनशे रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला. अन्य पाच दुकानांत मात्र त्यांना काहीच मिळाले नाही. सोमवारी सकाळी नऊ वाजता व्यापारी दुकाने उघडण्यासाठी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. संतोष चोप्रा यांच्या दुकानातून रोकड व मोबाईल लंपास केला असला तरी, एका तिजोरीत लॅपटॉपही होता. चोरट्यांनी तो खाली काढून ठेवला आहे. मात्र, तो नेला नाही. गोदामात दुचाकी होती. त्याला चावीही लावलेली होती. तीही चोरट्यांनी नेली नाही. (प्रतिनिधी)