बहे येथे एका रात्रीत ८ घरे फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:24 IST2021-02-15T04:24:09+5:302021-02-15T04:24:09+5:30

इस्लामपूर : बहे (ता. वाळवा) येथे शनिवारी रात्री ते पहाटेदरम्यान चोरट्यांनी धुमाकूळ घालून ७ ते ८ घरे फोडली. मात्र ...

8 houses were blown up in one night in Bahe | बहे येथे एका रात्रीत ८ घरे फोडली

बहे येथे एका रात्रीत ८ घरे फोडली

इस्लामपूर : बहे (ता. वाळवा) येथे शनिवारी रात्री ते पहाटेदरम्यान चोरट्यांनी धुमाकूळ घालून ७ ते ८ घरे फोडली. मात्र दोनच घरांमध्ये त्यांच्या हाताला १५ हजारांची रोकड व दागिने असा ३५ हजार रुपयांचा ऐवज हाती लागला. या धाडसी चोऱ्यांमुळे गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कडी-कोयंडे उचकटून आणि कटावणीने कुलूपे तोडून चोरट्यांनी धुडगूस घातला होता.

याबाबत कालिदास राजाराम पाटील (रा. बहे) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पहाटे ३ च्या सुमारास चोरीच्या या घटना घडल्या. पाटील यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून १५ हजारांची रोकड आणि सोन्याची नथ, अंगठी आणि बदाम अशा दागिन्यांची चोरट्यांनी चोरी केली, तर त्यांच्या शेजारी राहणारे जीवन विठ्ठलराव थोरात यांच्या घरातील १० हजार ५०० किमतीच्या दागिन्यांची चोरट्यांनी लूट केली. दरम्यान, परिसरातील आणखी काही घरांची कुलूपे कटावणीने तोडून चोरीचा प्रयत्न केला. मात्र या घरातून चोरट्यांच्या हाती काही लागले नाही.

Web Title: 8 houses were blown up in one night in Bahe