जिल्ह्यातील ७५९ संस्था निघणार अवसायनात
By Admin | Updated: October 1, 2015 22:47 IST2015-10-01T22:47:52+5:302015-10-01T22:47:52+5:30
सहकारी संस्थांचे सर्वेक्षण : सर्वाधिक बंद संस्थांची संख्या मिरज तालुक्यात, सर्वात कमी जतमध्ये

जिल्ह्यातील ७५९ संस्था निघणार अवसायनात
सांगली : बिनकामाच्या सहकारी संस्था बंद करून चालू संस्थांवर लक्ष केंद्रित करण्याच्यादृष्टीने करण्यात आलेल्या सर्वेक्षण मोहिमेत ३३४ संस्था बंद अवस्थेत, ३0४ संस्था कार्यस्थगित असलेल्या, तर १२१ संस्था जागेवरून गायब असल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक प्रवीण आष्टेकर यांनी जिल्ह्यातील ७५९ संस्था अवसायनात काढण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्याच्या सहकार विभागाने यासंदर्भात मोहीम सुरू केली आहे. सांगली जिल्ह्यासाठी या मोहिमेअंतर्गत प्रशासनातील आणि लेखापरीक्षण विभागातील ५४ जणांचे पथक नियुक्त करण्यात आले होते. या पथकाने ३० सप्टेंबरला सर्वेक्षण पूर्ण करून आपला अहवाल सादर केला. त्यानुसार जिल्ह्याचा एकत्रित अहवाल आता तयार झाला आहे. यामध्ये ४0८९ संस्थांचे सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी केवळ ३ हजार ३३0 संस्थाच चालू स्थितीत आढळून आल्या. त्यामुळे उर्वरित ७५९ सहकारी संस्था आता अवसायनात काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बिनकामाच्या सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करून उर्वरित संस्थांच्या गुणात्मक वाढीकडे लक्ष देण्याच्यादृष्टीने ही मोहीम सहकार विभागाने हाती घेतली आहे. या मोहिमेत ज्या सहकारी संस्था नोंदणीकृत पत्त्यावर आढळून येणार नाहीत किंवा ज्यांचा कोणताही ठावठिकाणा नाही, त्यांच्यासंदर्भात जाहीर प्रकटन प्रसिद्ध करून त्या संस्था बंद असल्याबाबतची खातरजमा करण्यात आली. पूर्णपणे बंद असलेल्या व कार्यस्थगित संस्था अवसायनात घेण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जिल्हा उपनिबंधकांनी यापूर्वीच दिल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील सहकारी संस्थांची संख्या मोठी आहे. कृषी बँका, कृषी पतसंस्था, नागरी बँका, नागरी पतसंस्था, कर्मचारी पतसंस्था, पणन संस्था, साखर कारखाने, औद्योगिक वसाहती, दूध संस्था, सूतगिरण्या, उपसा जलसिंचन संस्था, ग्राहक भांडारे, गृहनिर्माण संस्था, कामगार कंत्राटदार संस्था अशा अनेक प्रकारच्या सहकारी संस्था अस्तित्वात आहेत. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्थांची नावे शासकीय दफ्तरी नोंद असली तरी, प्रत्यक्षात दिलेल्या पत्त्यावर त्या संस्था अस्तित्वात नाहीत. काही संस्था केवळ कागदोपत्री जिवंत आहेत. सहकारी संस्थांची गर्दी कागदोपत्री मोठी दिसत आहे. आता सुस्थितीतील सहकारी संस्था कागदोपत्री व प्रत्यक्षात जिवंत राहतील. उर्वरित अनेक संस्था आता अवसायनात काढल्या जाणार असून, त्यांची नोंदणीही रद्द होणार आहे.
तालुकाएकूण चालू बंदबिनकामीगायबबंद होणाऱ्या
मिरज १२१४८११८४२३६८३ ४0३
जत २४५२२९४१२—— १६
कवठेमहांकाळ २१९१८८८२३—— ३१
पलूस३५७२८२६८७—— ७५
तासगाव २५५२१२३२११९ ४३
कडेगाव २१२१९८१४———— १४
खानापूर२१0१८११५५९ २९
शिराळा ३८६३३८३८——१0 ४८
वाळवा७७४६८४९0———— ९0
आटपाडी २१७२0७१0———— १0
एकूण ४0८0३,३३0३३४३0४१२१ ७५९