शिराळा तालुक्यात नवे ७३ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:35 IST2021-04-30T04:35:14+5:302021-04-30T04:35:14+5:30

: शिराळा तालुक्यात गुरुवारी नवीन ७३ कोरोना रुग्ण आढळून आले. शिराळा उपजिल्हा रुग्णालयात ७५ ...

73 new patients in Shirala taluka | शिराळा तालुक्यात नवे ७३ रुग्ण

शिराळा तालुक्यात नवे ७३ रुग्ण

: शिराळा तालुक्यात गुरुवारी नवीन ७३ कोरोना रुग्ण आढळून आले. शिराळा उपजिल्हा रुग्णालयात ७५ रुग्ण दाखल केल्याने या रुग्णालयात एकही बेड उपलब्ध नाही.

यामध्ये वाकुर्डे बुद्रुक ८, मणदूर ७, शिराळा, औढी प्रत्येकी ६, आंबेवाडी ४, चरण, कांदे, मांगले प्रत्येकी ३, भाटशिरगाव, चिखली, देववाडी, धामवडे, जांभळेवाडी, लादेवाडी, पाडळी, तडवळे, इस्लामपूर प्रत्येकी २, आरळा, चिखलवाडी, गुढे, खेड, कोकरूड, कुसाईवाडी, नाठवडे, नाटोली, पणुब्रे, रेड, सागाव, सावंतवाडी, शिरशी, टाकवे, मालेवाडी प्रत्येकी १ असे ७३ रुग्ण आढळून आले आहेत.

सध्या तालुक्यात ५३८ उपचाराखाली रुग्ण असून यामध्ये मिरज कोविड रुग्णालयात १, शिराळा कोविड सेंटर १०, शिराळा कोविड रुग्णालयात ७५, कोकरूड कोविड रुग्णालय २०, स्वस्तिक हॉस्पिटल १४, दालमिया सेंटर १, होम आयसोलेशनमध्ये ४०७ असे रुग्ण उपचार घेत आहेत. दुसऱ्या लाटेत आत्तापर्यंत सहा रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

Web Title: 73 new patients in Shirala taluka