गणेशोत्सवात सांगली, मिरजेतील ७२ जण हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:32 IST2021-09-14T04:32:33+5:302021-09-14T04:32:33+5:30
सोमवारी आणखी ७२ जणांना गणेशोत्सव कालावधीत महापालिका क्षेत्रातून हद्दपारीचा आदेश प्रांताधिकाऱ्यांनी दिला. दोन दिवसांपूर्वी ३३ जणांना हद्दपार ...

गणेशोत्सवात सांगली, मिरजेतील ७२ जण हद्दपार
सोमवारी आणखी ७२ जणांना गणेशोत्सव कालावधीत महापालिका क्षेत्रातून हद्दपारीचा आदेश प्रांताधिकाऱ्यांनी दिला. दोन दिवसांपूर्वी ३३ जणांना हद्दपार करण्यात आले होते. आतापर्यंत १०५ जण गणेशोत्सव कालावधीसाठी हद्दपार झाले आहेत.
गणेशोत्सव काळात सांगली, मिरज शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल असलेल्या सांगली, मिरज व कुपवाड शहरात १६३ जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे सादर केले होते. हद्दपारीच्या प्रस्तावावर सोमवारी सुनावणी होऊन प्रांताधिकाऱ्यांनी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांसह ७२ जणांना १९ सप्टेंबर पर्यंत हद्दपारीचा आदेश पोलिसांना दिला.
सांगली, मिरज व कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यातून एकूण १६३ जणांच्या हद्दपारीचा प्रस्ताव प्रांताधिकारी कार्यालयाकडे दाखल करण्यात आला. यात मिरजेतील ४२, गांधी चौकी हद्दीतील ११ व मिरज ग्रामीण हद्दीतील ४९ अशा १०२ जणांचा समावेश आहे. सांगली शहर व अन्य कवठेमहांकाळ तालुक्यातील १६३ जणांपैकी १०५ जणांवर हद्दपारीची कारवाई झाली असून उर्वरित प्रस्तावावर आज, मंगळवारी सुनावणी होणार आहे.