शिराळा तालुक्यात ६८ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:27 IST2021-04-25T04:27:19+5:302021-04-25T04:27:19+5:30
शिराळा : शिराळा तालुक्यात शनिवारी नवीन ६८ कोरोना रुग्ण आढळून आले. यामध्ये शिराळा येथे १२, औढी सात, वाकाईवाडी ...

शिराळा तालुक्यात ६८ नवे रुग्ण
शिराळा
: शिराळा तालुक्यात शनिवारी नवीन ६८ कोरोना रुग्ण आढळून आले. यामध्ये शिराळा येथे १२, औढी सात, वाकाईवाडी सहा, खेड पाच, कोकरूड, वाकुर्डे बुद्रुक प्रत्येकी चार, मणदूर तीन, आंबेवाडी, भागाईवाडी, गुढे, माणेवाडी, मालेवाडी, सावंतवाडी, एसलेवाडी, येलूर प्रत्येकी दोन, बेलदारवाडी, बेलेवाडी, देववाडी, कलेढोण, कणदूर, मांगले, मानकरवाडी, पणुब्रे वारुण, टाकवे, भटवाडी, कार्वे प्रत्येकी एक असे ६८ रुग्ण आढळून आले आहेत. सध्या तालुक्यात ४६२ उपचाराखाली रुग्ण असून यामध्ये मिरज कोविड रुग्णालयात एक, शिराळा कोविड सेंटर सात, शिराळा कोविड रुग्णालयात ३०, कोकरूड कोविड रुग्णालय १३, स्वस्तिक हॉस्पिटल १४, दालमिया सेंटर एक, होम आयसोलेशनमध्ये ३९६ असे रुग्ण उपचार घेत आहेत. दुसऱ्या लाटेत आतापर्यंत पाच रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहेत.