जिल्ह्यात कोरोनाचे ६७६ नवे रुग्ण; १५ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:30 IST2021-08-13T04:30:51+5:302021-08-13T04:30:51+5:30
जिल्ह्यातील १३ जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली १, मिरज ३, पलूस, तासगाव प्रत्येकी २, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ, वाळवा आणि ...

जिल्ह्यात कोरोनाचे ६७६ नवे रुग्ण; १५ जणांचा मृत्यू
जिल्ह्यातील १३ जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली १, मिरज ३, पलूस, तासगाव प्रत्येकी २, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ, वाळवा आणि मिरज तालुक्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
उपचार घेत असलेल्या ६४६९ जणांपैकी ८०६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ६९२ जण ऑक्सिजनवर, तर ११४ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
आरोग्य विभागाने आरटीपीसीआर अंतर्गत ४७४४ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ३३७ जण पॉझिटिव्ह आढळले, तर रॅपिड ॲन्टिजनच्या ६७५७ जणांच्या नमुने तपासणीतून ३५० जण बाधित आढळले. परजिल्ह्यातील दोघांचा मृत्यू, तर नवीन ११ रुग्ण उपचारास दाखल झाले.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १८३३५८
उपचार घेत असलेले ६४६९
कोरोनामुक्त झालेले १७२०६९
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४८२०
गुरुवारी दिवसभरात
सांगली ९६
मिरज २८
आटपाडी २६
कडेगाव ५७
खानापूर ४५
पलूस ३०
तासगाव ७६
जत ५०
कवठेमहांकाळ ४०
मिरज तालुका १००
शिराळा ८
वाळवा १२०