शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: कुंडल वन अकॅडमीमध्ये ६३ प्रशिक्षणार्थींना विषबाधा, वेळेत उपचार मिळाल्याने सर्वांची प्रकृती स्थिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 16:37 IST

अन्नाच्या पॅकेटांमुळे त्रास

कुंडल : कुंडल वन अकॅडमीमध्ये बाहेरून आणलेल्या अन्नाच्या पॅकेटमुळे ६३ प्रशिक्षणार्थींना विषबाधा झाली आहे. या अकॅडमीत देशभरातून शासकीय सेवेत रुजू होणारे नवनिर्वाचित उमेदवार प्रशिक्षणासाठी येत असतात. त्याचपद्धतीने महाराष्ट्र दर्शनासाठी चिखलदरा वन प्रशिक्षण येथील ११० जणांच्या फॉरेस्ट गार्डची बॅच भेट देण्यासाठी रविवारी (दि. २३) आली होती. येताना त्यांनी नसरापूर (जि. पुणे) येथून जेवणाची पॅकेट घेतली होती. ही पॅकेट त्यांनी कुंडल येथे आल्यावर म्हणजे साधारण ६ वाजता खाल्ली. नंतर रात्रीचे जेवण कुंडल वन अकॅडमी येथे केले. याचवेळी काहींना त्रास होत होता.सोमवारी (दि. २४) सकाळी ८:३० वाजता नियमित प्रशिक्षण सुरू झाल्यावर काही प्रशिक्षणार्थी महिलांना त्रास झाल्यावर त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यापैकी ६३ प्रशिक्षणार्थींना अन्नाच्या पॅकेटमुळे पोट बिघडणे, उलटी आणि चक्कर येऊ लागली. यातील कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन, पलूस ग्रामीण रुग्णालयात १७, तर सांगली येथे शासकीय रुग्णालयात ८ प्रशिक्षणार्थी उपचार घेत आहेत. तर बाकीच्या प्रशिक्षणार्थींची किरकोळ उपचारानंतर प्रकृती स्थिर आहे.

सर्व प्रशिक्षणार्थींची प्रकृती स्थिर आहे. बाहेरून आणलेल्या खाद्यपदार्थ आणि उन्हाचा तडाखा यामुळे त्यांना हा त्रास झाला आहे. वेळेत उपचार मिळाल्याने काळजी करण्याचे कोणतेच कारण नाही. - यशवंत बहाडे, संचालक, चिखलदरा वन प्रशिक्षण संस्था. 

घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त आहे, तर प्रशिक्षणार्थींना वैद्यकीय उपचार पुरविले आहेत. पोलीस यंत्रणा शक्य ती मदत करत आहे. - जयसिंग पाटील, सहायक पोलिस निरीक्षक, कुंडल पोलिस स्टेशन

टॅग्स :Sangliसांगलीforest departmentवनविभागfood poisoningअन्नातून विषबाधा