घरकुल देण्याच्या बहाण्याने ६२ हजारांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:25 IST2021-01-21T04:25:16+5:302021-01-21T04:25:16+5:30
बाळासाहेब मल्लेवाडे व गणेश कांबळे या दोघांनी एकात्मिक गृह निर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत मिरजेतील संजयनगर येथे बांधण्यात आलेल्या ...

घरकुल देण्याच्या बहाण्याने ६२ हजारांचा गंडा
बाळासाहेब मल्लेवाडे व गणेश कांबळे या दोघांनी एकात्मिक गृह निर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत मिरजेतील संजयनगर येथे बांधण्यात आलेल्या घरकुलमध्ये सदनिका मिळवून देतो, असे सांगून हिना जमखानेवाले व इम्तियाज जमखानेवाले यांच्याकडून १४ एप्रिल २०२० रोजी ३० हजार रुपये आणि दि. २५ मे रोजी ३० हजार रुपये, तर या सदनिकेत वीज कनेक्शन देण्यासाठी अतिरिक्त दोन हजार रुपये असे ६२ हजार रुपये घेतले.
मल्लेवाडे व कांबळे यांनी सदनिका मिळविण्यासाठी महापालिकेत कागदपत्रे दाखल करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून त्यावर खोट्या सह्या करून हिना व इम्तियाज जमखानेवाले यांची व महापालिकेची फसवणूक केल्याचे उघडकीस आला आहे. त्याबाबत महापालिकेचे अभियंता बी. आर. पांडव यांनी गांधी चौक पोलिसात फिर्याद दिली असून, मल्लेवाडे व कांबळे या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.