जिल्ह्यात ६१ टक्के खरीप पेरण्या थांबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:18 IST2021-07-04T04:18:41+5:302021-07-04T04:18:41+5:30

सांगली : जिल्ह्यात खरीप पेरणीचे तीन लाख ५६ हजार ९५५ हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी एक लाख ३८ हजार ४३६ ...

61% kharif sowing stopped in the district | जिल्ह्यात ६१ टक्के खरीप पेरण्या थांबल्या

जिल्ह्यात ६१ टक्के खरीप पेरण्या थांबल्या

सांगली : जिल्ह्यात खरीप पेरणीचे तीन लाख ५६ हजार ९५५ हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी एक लाख ३८ हजार ४३६ हेक्टरवर म्हणजे ३९ टक्के पेरणी झाली आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे ६१ टक्के क्षेत्रात पेरण्या थांबल्या आहेत. दुष्काळी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर तालुक्यांमध्ये दुबार पेरणीचे संकट आहे.

मान्सूनपूर्व पाऊस चांगला झाल्यामुळे शिराळा तालुक्यात भाताची १७ हजार ५३० हेक्टर क्षेत्रापैकी १४ हजार ७० हेक्टरवर पेरणी झाली आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळला कडधान्य आणि बाजरीची ६२ टक्के पेरणी झाली आहे. कमी कालावधीत चांगले उत्पन्न देणारे मका पीक असून, जिल्ह्यात ३५ हजार ८४७ हेक्टरपैकी १५ हजार ३५५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोयाबीनचे ४७ हजार १०१ हेक्टर क्षेत्र असून, २६ हजार ३६४ हेक्टर म्हणजे ५६ टक्के पेरणी झाली आहे.

जिल्ह्यात खरिपाची ३९ टक्के पेरणी झाली असून, उर्वरित ६१ टक्के पेरण्या थांबल्या आहेत. शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, पेरणी झाल्यानंतर पाऊस गायब झाल्यामुळे माळरानातील पिके कोमेजू लागली आहेत.

चौकट

जिल्ह्यातील पाऊस (मिलिमीटर)

तालुका १ जूनपासूनचा पाऊस

मिरज २३४.२

खानापूर ९८.७

वाळवा २४६.८

तासगाव १६५.८

जत १७०.८

शिराळा ३५९.२

आटपाडी ९८.७

क. महांकाळ १४८.९

पलूस २२१.२

कडेगाव १७२.७

चौकट

जिल्ह्यातील खरिपाची पीकनिहाय पेरणी

पीक पेरणी क्षेत्र टक्के

भात १४०७० हेक्टर ८०

ज्वारी ७३१४ १३

बाजरी ३२८७९ ६२

मका १५३५५ ४३

तूर ४९६५ ६५

कडधान्य १६६३१ ४३

भुईमूग १६९१५ ५७

सोयाबीन २६३६४ ५६

Web Title: 61% kharif sowing stopped in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.