सांगलीत सराफ दुकानातून ६० हजारांचे मंगळसूत्र लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:30 IST2021-03-01T04:30:27+5:302021-03-01T04:30:27+5:30

सांगली : शहरातील सराफ बाजार परिसरात असलेल्या एका ज्वेलरी दुकानातून अज्ञातांनी ६० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र लांबविले. या प्रकरणी ...

60,000 Mangalsutra lamps from Sangli goldsmith shop | सांगलीत सराफ दुकानातून ६० हजारांचे मंगळसूत्र लंपास

सांगलीत सराफ दुकानातून ६० हजारांचे मंगळसूत्र लंपास

सांगली : शहरातील सराफ बाजार परिसरात असलेल्या एका ज्वेलरी दुकानातून अज्ञातांनी ६० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र लांबविले. या प्रकरणी प्रदीप लक्ष्मण पुराणिक (रा. शामरावनगर, सांगली) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी पुराणिक यांचे सराफ बाजारात सराफ ॲन्ड सन्स नावाचे ज्वेलरी दुकान आहे. बुधवारी (दि. २४) दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांच्या दुकानात एक महिला व पुरुष आले. यातील महिलेने चष्मा आणि तोंडाला मास्क लावला होता; तर पुरुषानेही रुमालाने तोंड झाकले होते. त्यांनी मंगळसूत्र बघण्याच्या बहाण्याने ६० हजार रुपये किमतीचे एक मंगळसूत्र लंपास केले. काही वेळानंतर चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी शोध घेतला; मात्र, कोणी आढळून आले नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.

Web Title: 60,000 Mangalsutra lamps from Sangli goldsmith shop