शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

Sangli: पेठनाक्यावर पकडला तब्बल ६० लाखांचा गोवा बनावटीचा दारूसाठा, वाहन चालक ताब्यात

By हणमंत पाटील | Updated: October 25, 2023 15:43 IST

युनूस शेख इस्लामपूर : इस्लामपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने पेठनाका येथे सापळा रचून तब्बल ६० लाखांचा गोवा बनावटीच्या ४८ ...

युनूस शेखइस्लामपूर : इस्लामपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने पेठनाका येथे सापळा रचून तब्बल ६० लाखांचा गोवा बनावटीच्या ४८ हजार बाटल्यांची वाहतूक करणारा ट्रक पकडला. सोमवारी (दि.२३) रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यामध्ये मालट्रकसह ७५ लाखांचा मुद्देमाल आणि चालकास ताब्यात घेण्यात आले. इस्लामपूर पोलीस ठाण्याची ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली.सलमान मकानदार (रा.डफळापूर, ता.जत) असे ताब्यात घेण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. हा दारू साठा कराड येथील जमील पटेल याच्याकडे जाणार असल्याची माहिती पथकाला मिळाली असून त्याचा शोध घेण्यासाठी दुसरे पथक रवाना झाले आहे. राष्ट्रीय महामार्गावरून बेकायदा गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर लगेच पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय हारुगडे यांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने पेठनाका परिसरात सापळा लावला. रात्री १० च्या सुमारास परिसरात नाकाबंदी लावत संशयित ट्रक (एम एच ५० एन ३९९९) थांबविण्यात आला. तपासणी केली असता तब्बल ६० लाखांचा गोवा बनावटीचा दारूसाठा पोलिसांनी जप्त केला.ही कारवाई सहायक निरीक्षक चेतन माने, हवालदार विनायक देवळेकर, अभिजित पाटील, उदय पाटील, गुप्त वार्ता विभागाचे अमर जंगम व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस