शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्याच्या विकासाचा ५७३ कोटींचा आराखडा - पालकमंत्री सुरेश खाडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 17:05 IST

सांगली : विकास प्रक्रियेत मागे राहिलेल्या वंचित, मागास बांधवांना सगळ्यांबरोबर संधी मिळावी, यासाठी शासनाचे प्रयत्न सुुरू आहेत. यासाठी जिल्ह्याच्या ...

सांगली : विकास प्रक्रियेत मागे राहिलेल्या वंचित, मागास बांधवांना सगळ्यांबरोबर संधी मिळावी, यासाठी शासनाचे प्रयत्न सुुरू आहेत. यासाठी जिल्ह्याच्या विकासकामांचा २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ५७३ कोटींचा आराखडा तयार केला आहे. जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिली.स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सुरेश खाडे बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, डॉ. विजयकुमार शहा, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील, अपर पोलिस अधीक्षक रितू खोखर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्यासह विविध कार्यालय प्रमुख, स्वातंत्र्य सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, नागरिक उपस्थित होते.

सुरेश खाडे म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पहिल्या टप्प्यात आतापर्यंत ४ लाख ६० हजार अर्ज प्राप्त झाले असून जिल्ह्यात यापैकी ४ लाख ४५ हजारांहून अधिक अर्जांना मान्यता दिली आहे. या योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तसेच ९० हजारांपेक्षा अधिक कामगारांना विविध योजनेंतर्गत जवळपास २२० कोटींहून अधिक रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.

प्रशांत पाटील यांचा गौरवजम्मू-काश्मिर येथे सीमा नियंत्रण रेषेवर कार्यरत असताना दिव्यांगत्व आलेल्या तासगाव तालुक्यातील बेंद्री येथील हवालदार प्रशांत वसंत पाटील यांना त्यांच्या शौर्याच्या सन्मानार्थ ताम्रपट व २० लाख रुपये सानुग्रह अनुदान देऊन सन्मान केला.

वल्लभी शेंडगेचाही गौरवसांगलीतील आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूलची वल्लभी शेंडगे हिने गार्डनमधील अनोख्या झोपाळ्याचे केलेल्या संशोधनासाठी भारत सरकारचे पेटंट मिळाले आहे. याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.

यांचा शासनाकडून गौरवपोलिस प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी बजाविलेल्या अनुक्रमे मिरज उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा, विटा उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील, पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, पोलिस हवालदार सागर लवटे, पोलिस नाईक संदीप नलावडे, पोलिस फौजदार महेश जाधव व शरद माने, सहायक पोलिस फौजदार राजेंद्र पाटील, चालक पोलिस हवालदार अनिल सूर्यवशी व संजय माने यांच्यासमवेत महसूल दिनानिमित्त महसूल विभागातील, विभागीय स्तरीय पुरस्कारासाठी निवड झालेल्या सहायक जिल्हा नियोजन अधिकारी पूजा पाटील, लघुटंकलेखक वहिदा तांबोळी-मणेर, अव्वल कारकून विनायक यादव यांचा पालकमंत्री खाडे यांच्या हस्ते सत्कार केला.

टॅग्स :Sangliसांगलीfundsनिधी