शिराळा तालुक्यात नवीन ५५ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:28 IST2021-04-27T04:28:24+5:302021-04-27T04:28:24+5:30

शिराळा : शिराळा तालुक्यात सोमवारी ५५ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले. दिवसभरात २१२ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये धामवडे ...

55 new patients in Shirala taluka | शिराळा तालुक्यात नवीन ५५ रुग्ण

शिराळा तालुक्यात नवीन ५५ रुग्ण

शिराळा : शिराळा तालुक्यात सोमवारी ५५ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले. दिवसभरात २१२ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये धामवडे व मणदूर येथे प्रत्येकी ५, अंत्री बुद्रुक येथे ४, देववाडी, कोकरूड, मांगले, शिराळा येथे प्रत्येकी ३, आंबेवाडी, आरळा, चिंचोली, मोरेवाडी, शेडगेवाडी, सोंडोली, टाकवे, कार्वे येथे प्रत्येकी २, औढी, बांबवडे, बिऊर, चरण, धुरंदेवाडी, मालेवाडी, पाडळी, सांगाव, सरूड, शिरशी, उपवळे, विरवाडी, ऐतवडे खुर्द येथे प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला. सध्या तालुक्यात ५३९ रुग्ण उपचाराखाली आहेत. मिरज कोविड रुग्णालयात १, शिराळा कोविड सेंटरमध्ये ७, शिराळा कोविड रुग्णालयात ३४, कोकरूड कोविड रुग्णालयात १३, स्वस्तिक हॉस्पिटल येथे १४, दालमिया सेंटरमध्ये १ रुग्ण दाखल आहे. होम आयसोलेशनमध्ये ४६९ रुग्ण उपचार घेत आहेत. दुसऱ्या लाटेत आत्तापर्यंत पाच रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

Web Title: 55 new patients in Shirala taluka