शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: म्हैसाळ, टेंभू योजनेसाठी ५४.३८ कोटी मंजूर; कवठेमहांकाळमधील १४ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 16:41 IST

कवठेमहांकाळ :  खासदार संजय पाटील यांच्या माध्यमातून व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे म्हैसाळ व टेंभू योजनेच्या ५४.३८ ...

कवठेमहांकाळ :  खासदार संजय पाटील यांच्या माध्यमातून व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे म्हैसाळ व टेंभू योजनेच्या ५४.३८ कोटीच्या लघु वितरिका मंजूर झाल्या आहेत. या माध्यमातून तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील सुमारे १४ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे, अशी माहिती भाजपचे नेते प्रभाकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.पाटील म्हणाले, तासगाव तालुक्यातील मणेराजुरी मुख्य वितरिका, मणेराजुरी उपवितरिका, योगेवाडी, उपळावी लघु वितरिका, वज्रचाैडे अशा १३.५३ कोटीच्या लघु वितरिका म्हैसाळ योजनेतून मंजूर झाल्या आहेत. म्हैसाळ योजनेतून कवठेमहांकाळ तालुक्यात विठुरायाची वाडी, कवठेमहांकाळ, थबडेवाडी, पिंपळवाडी, अग्रण धुळगाव, नांगोळे, अलकुड (एस), रांजणी आणि लोणारवाडी लघु वितरिका मंजूर झाल्या आहेत. याकरिता ३२.३५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.टेंभू योजनेतून कवठेमहांकाळ तालुक्यात दहा गावांत ८.५ कोटीच्या लघु वितरिका मंजूर झाल्या आहेत. यामुळे नागज, रांजणी, कोकळे, ढालेवाडी, करलहट्टी, बसाप्पाचीवाडी, मोघमवाडी, इरळी, अलकूड (एस), ढोलेवाडी या गावच्या शेतीच्या व पिण्याच्या प्रश्न सुटणार आहे. गेल्या दीड वर्षांपासून याबाबत आम्ही अधिकाऱ्यांसह गावभेटी केल्या. खासदार संजय पाटील यांनी याप्रकरणी अधिकाऱ्याची बैठक घेतली. कामाच्या निविदाही प्रसिद्ध झाल्या आहेत. काही ठिकाणी कामाला सुरुवातही झाली आहे.टेंभू योजनेतून कवठेमहांकाळ तालुक्यात एक हजार एकर, तर म्हैसाळ योजनेतून कवठेमहांकाळ तालुक्यातील ७,७८० एकर, तासगाव तालुक्यातील ५,२२७ एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. दोन्ही तालुक्यांत ५४.३८ कोटींच्या लघु वितरिका मंजूर झाल्या आहेत. यातून सुमारे १४ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. खासदार संजय पाटील यांच्या माध्यमातून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे लघु वितरिका मंजूर झाल्या.यावेळी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी, सदस्य राजाराम पाटील, नगरसेवक रणजित घाडगे, ईश्वर वनखडे, सोमनाथ लाटवडे, जलाल शेकडे, दयानंद सगरे, पिंटू माने उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी