शिराळा तालुक्यात ५१ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:19 IST2021-06-21T04:19:17+5:302021-06-21T04:19:17+5:30

शिराळा : शिराळा तालुक्यात रविवारी १९ गावांमध्ये ५१ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले. सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्या कमी ...

51 patients in Shirala taluka | शिराळा तालुक्यात ५१ रुग्ण

शिराळा तालुक्यात ५१ रुग्ण

शिराळा : शिराळा तालुक्यात रविवारी १९ गावांमध्ये ५१ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले. सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्या कमी असल्याने दिलासा मिळाला आहे. शिराळा, मांगले, सांगाव, गिरजवडे, मणदूर, तडवळे, बिऊर, पाडळी ही हॉटस्पॉट गावे झाली आहेत. रविवारी मांगले येथे १६, सांगाव येथे ६, शिराळा येथे ५, चव्हाणवाडी व मांगरुळ येथे प्रत्येकी ३, अंत्री बुद्रुक, कांदे, कणदूर, नाटोली येथे प्रत्येकी २ यासह १९ गावात ५१ रुग्ण आढळून आले आहेत. सध्या ७०३ रुग्ण उपचाराखाली आहेत. यापैकी ६२३ रुग्ण गृह अलगीकरणात आहेत तर संस्थात्मक विलगीकरण कक्षात ६, उपजिल्हा रुग्णालयात ४३, कोकरूड ग्रामीण रुग्णालयात २४, स्वस्तिक कोविड सेंटरमध्ये ३, तर खासगी रुग्णालयांमध्ये ४ रुग्ण उपचार घेत आहेत.

Web Title: 51 patients in Shirala taluka