शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा परिषदेत वर्षभरात नव्या ५०४ ठेकेदारांची भर, ठेकेदार होण्याकडे तरुणांचा कल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 16:30 IST

नाेंदणीसाठी अशी लागतात कागदपत्रे

सांगली : सध्या सिव्हिल इंजिनिअरिंग आणि स्थापत्य अभियंता पदवी घेऊन ठेकेदार होण्याकडे तरुणांचा कल वाढल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षभरात ५०४ सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची जिल्हा परिषदेकडे नोंदणी झाली असून, आतापर्यंत दोन हजार २२२ अभियंत्यांची नोंदणी झाली. सिव्हिल अभियंता पदवी व पदविका मिळवूनही नोकरी मिळत नसल्याने तरुण ठेकेदारीकडे वळल्याचे दिसत आहे.शासकीय कंत्राट घेण्यासाठी परवाना घेणे आवश्यक आहे. आर्थिक स्थिती चांगली आणि कामे करण्याचा काही वर्षांचा अनुभव गाठीशी असेल तर ठेकेदारी करण्याचे तरुण धाडस करत होते. आता चित्र बदलले आहे. कामाचा अनुभव असो की नसो सिव्हिल अभियंता पदवी घेतल्यानंतर तरुण शासकीय कामे घेण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे येत आहेत.पूर्वी ठेकेदार होण्यासाठी नोंदणी करण्याचे प्रमाण कमी होते; पण सध्या वाढल्याचे शासकीय आकडेवारी सांगत आहे. २०२१-२२ मध्ये सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची एक हजार ३६७ संख्या होती. यामध्ये ३५० सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची भर पडून एक हजार ७१७ झाली. २०२२-२३ या वर्षात ५०४ सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची नव्याने नोंदणी झाली आहे. यामुळे सध्या दोन हजार २२२ संख्या झाली आहे. सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची नोंदणी वाढली आहे. दोन ते तीन वर्षांत दुप्पट नोंदणी झाली आहे; पण तेवढ्या प्रमाणात कामे मिळत नसल्याची त्यांची खंत आहे. नोंदणीच्या संख्येनुसार कामे मिळावीतशासनाने सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन कामे दिली पाहिजेत. मिरज तालुक्यातच पाचशेहून अधिक अभियंत्यांची नोंदणी आहे; परंतु जिल्हा परिषदेकडून केवळ दोन कामे मिळाली. उर्वरित अभियंत्यांनी काय करायचे, असा सवालही सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे अध्यक्ष महावीर पाटील यांनी उपस्थित केला.नाेंदणीसाठी अशी लागतात कागदपत्रेनियमित ठेकेदार म्हणून परवाना मिळविण्यासाठी इच्छुक ठेकेदारांना वय, रहिवासी दाखला, खासगी कामे केल्याच्या अनुभवाचे प्रमाणपत्र, जेवढ्या रकमेची कामे करायची त्या दुप्पट रकमेची कामे केल्याचे आर्किटेक्ट प्रमाणित प्रमाणपत्र आदी कागदपत्रे लागतात. या कागदपत्रांची पुर्तता हाेत असल्यासच परवाना दिला जाताे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.६१६ मजूर सोसायट्यांची नोंदणीजिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची दोन हजार २२२ नोंदणी असून मजूर सोसायट्यांची संख्या ६१६ आहे. मजूर सोसायट्यांच्या तुलनेत अभियंत्यांची संख्या जास्त असूनही त्यांना ३३ टक्केच कामे मिळत होती. अभियंत्यांच्या तक्रारीनंतर शासनाने सध्या ४० टक्क्यांपर्यंत प्रमाण केले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषद