कोविड सेंटरला ५० हजाराची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:18 IST2021-06-11T04:18:07+5:302021-06-11T04:18:07+5:30
सांगली : भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय कोविड सेंटरला महापालिका स्थायी सभापती पांडुरंग कोरे ...

कोविड सेंटरला ५० हजाराची मदत
सांगली : भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय कोविड सेंटरला महापालिका स्थायी सभापती पांडुरंग कोरे यांनी ५० हजार रुपयांची मदत दिली. त्यांनी आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडे मदतीचे पत्र दिले. यावेळी भाजपा प्रदेश सदस्य मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, संघटक सरचिटणीस दीपक माने, सचिव विश्वजीत पाटील, युवा उपाध्यक्ष कृष्णा राठोड, अल्पसंख्याक उपाध्यक्ष कयुम शेख उपस्थित होते.
--------
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मास्क वाटप
फोटो : १० शीतल ०२
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त विश्रामबाग, स्फूर्ती चौक, गणपती मंदिर, वारणाली परिसरामध्ये २,२०० मास्कचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे सांगली शहर अध्यक्ष ऋषिकेश कांबळे व सोशल मीडिया अध्यक्ष मनोज हेगडे यांनी केले. यावेळी माजी नगरसेवक युवराज गायकवाड, संदीप व्हनमाने, प्रफुल्ल जाधव, अभिजीत रांजणे, मोसीन शेख, सुधाकर कांबळे, इरफान कागवाडे, प्रीतम कांबळे, फिरोज पखाली उपस्थित होते.
---------