शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता सुरक्षा अभियान काळात ५० जणांचा बळी, सांगलीत अपघातांचे प्रमाण वाढले

By घनशाम नवाथे | Updated: February 7, 2025 16:08 IST

उसाच्या ट्रॅक्टरचे आठ बळी

घनशाम नवाथे सांगली : पूर्वी रस्ता सुरक्षा सप्ताह राबवला जात होता. नंतर सप्ताहाचा पंधरवडा झाला. आता महिनाभर रस्ता सुरक्षा अभियान राबवले गेले. परंतु या महिन्यात जिल्ह्यात एक दोन नव्हे तर तब्बल ५० जणांचा अपघाती बळी गेला. त्यामुळे हे अभियान सतत राबवण्याची आवश्यक आहे. वाढते अपघात रोखण्यासाठी सामाजिक चळवळ उभी राहण्याची गरज भासू लागली आहे.जिल्ह्यात पूर्वी वारंवार अपघात होणारे जवळपास ६० ते ७० ‘ब्लॅक स्पॉट’ होते. याठिकाणी वर्षानुवर्षे अपघाताचा धोका दर्शवणारे फलक होते. परंतु अपघातस्थळे नष्ट करण्यात आली नव्हती. न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वत्र अपघात स्थळे नष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. जिल्ह्यातील अपघात स्थळे नष्ट करण्यासाठी प्रयत्न झाले. त्यामुळे सध्या केवळ बोटावर मोजण्याइतपत अपघातस्थळे कायम आहेत.

एकीकडे अपघातस्थळे नष्ट केली जात असून रस्तेही मोठे झाले आहेत. पूर्वी नादुरुस्त रस्ते, खड्डे, गतिरोधक आदी कारणामुळे अपघात होत होते. परंतु आता मानवी चुकांमुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. वाहतुकीच्या नियमाचे पालन न करणे, बेदरकारपणे वाहन चालवणे, नशेत वाहन चालवणे आदी कारणामुळे अपघात होऊ लागलेत.नुकतेच जानेवारी महिन्यात रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आले. आरटीओ, पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले गेले. परंतु याच महिन्याच्या काळात तब्बल ५० जणांचा अपघाती बळी गेला. तर शंभरहून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे हे अभियान आता महिन्यापुरते नव्हे तर वर्षभर सामाजिक चळवळ म्हणून राबवण्याची गरज आहे.

उसाच्या ट्रॅक्टरचे आठ बळीरस्ता सुरक्षा अभियानात उसाच्या ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली. परंतु ती शंभर टक्के पूर्ण झाली नाही. त्यामुळेच जानेवारी महिन्यात उसाच्या ट्रॅक्टर, ट्रॉलीमुळे आठ जणांचा बळी गेला. तसेच त्यापेक्षा जास्त वाहन चालक जखमी झाले. ट्रॅक्टर मालक, चालकांच्या बेदरकारपणामुळे दरवर्षी अनेकांचा बळी जातो.

जत तालुक्यात अपघात वाढलेजानेवारी महिन्यात जत तालुक्यात आठ जणांचा अपघाती बळी गेला. त्यापाठोपाठ इस्लामपूरमध्ये सहा जणांचा अपघातात मृत्यू झाला. भिलवडी (५), आटपाडी (४), तासगाव (३), विटा (३), कडेगाव (३), पलूस (३) याप्रमाणे १८ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ५० जणांचा बळी गेला.

अपघाताची कारणेचुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, वेगाने वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे, स्वत: बद्दल फाजिल आत्मविश्वास बाळगून वाहन चालवणे, हेल्मेट न वापरणे, सीटबेल्ट न लावणे आदी प्रमुख कारणांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येते.

आजार, युद्धापेक्षा जास्त बळीरस्ता सुरक्षा अभियानाच्या प्रारंभी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांनी अपघाताचे प्रमाण वाढल्याबद्दल चिंता व्यक्त केली. एखाद्या आजाराच्या साथीमध्ये किंवा युद्धात ही जात नाहीत इतके बळी अपघातात जातात असे सांगितले गेले. त्यामुळे आता अपघात रोखण्यासाठी चळवळीची गरज भासू लागली आहे.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू