दुष्काळी भागातील ५0% तलाव भरले

By Admin | Updated: September 9, 2014 23:43 IST2014-09-09T23:10:50+5:302014-09-09T23:43:38+5:30

दिलासादायी चित्र : जिल्ह्यातील १७ तलाव तुडुंब

50% of the drought-filled areas are filled with ponds | दुष्काळी भागातील ५0% तलाव भरले

दुष्काळी भागातील ५0% तलाव भरले

अंजर अथणीकर - सांगली -सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला यंदा पावसाने दिलासा दिल्याचे चित्र आहे. दुष्काळी आटपाडी, खानापूर या दोन तालुक्यातील तलाव निम्म्याहून अधिक भरले आहेत. जिल्ह्यात एकूण ८३ तलाव असून, यापैकी १६ तलावांमध्ये क्षमतेच्या ७५ टक्क्याहून अधिक पाणीसाठा आहे. आज (शनिवार) जिल्ह्यात ४० टक्क्याहून अधिक पाणीसाठा असून, हा साठा गतवर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे. आॅगस्टमध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे सर्वच टँकर बंद करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात जुलै महिन्यात केवळ १५ टक्के पाणीसाठा होता. आॅगस्टमध्ये चांगला पाऊस झाल्याने पाण्याचा साठा आता ४० टक्क्याहून अधिक झाला आहे. दमदार पावसामुळे जिल्ह्यातील ८३ तलावांपैकी १७ तलाव पूणपणे भरले आहेत. त्याचबरोबर १६ तलावांमध्ये ७० टक्क्याहून अधिक पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील ८३ तलावांची पाणी क्षमता ९ हजार ३९८.७५ दश लक्ष घनफूट असून, आज त्यामध्ये ३ हजार ७१०.१८ दशलक्ष घनफूट पाणी आहे. यामध्ये आणखीन वाढ होत आहे.
खानापूर तालुक्यातील १, कडेगाव तालुक्यातील ५, शिराळा तालुक्यातील ५, आटपाडी तालुक्यातील २, मिरज तालुक्यातील १ व वाळवा तालुक्यातील १ तलाव शंभर टक्के भरला आहे. शनिवारी एकूण पाणीसाठा ३ हजार ७१०.१८ दशलक्ष घनफूट इतका नोंदला गेला आहे. गतवर्षी यावेळी हा पाणीसाठा २ हजार १५.३२ दशलक्ष घनफूट होता. गतवर्षी आॅगस्टच्या अखेरीस २१ टक्के पाणीसाठा तलावामध्ये होता, तो आता ४० टक्के झाला आहे.
जिल्ह्यात आॅगस्टमध्ये १५३ सिमेंट बंधारे बांधण्याचे प्रस्ताव सादर करण्यात आले असून, यासाठी २३ कोटी ४ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामधील सर्व बंधाऱ्यांचा सर्व्हे पूर्ण करण्यात आला आहे. त्याचबरोबर यामधील १२९ बंधाऱ्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण करुन यामधील ४८ बंधाऱ्यांची पाया खुदाईही पूर्ण करण्यात आली आहे. ३१ बंधाऱ्यांची कामे आता पूर्णत्वाकडे आहेत. जिल्ह्यातील १५३ बंधारे पूर्ण झाल्यास त्यामध्ये ६ हजार ३३ घनमीटर पाणीसाठा राहणार आहे.

तालुकातलाव साठाटक्के
तासगाव ७२१५.८५३०
खानापूर८२४६.४८३७
कडेगाव६५५६.६८७८
शिराळा५१०७१.५५१००
आटपाडी१३५२७.३०३९
जत२८६०९.१५१६
क.महांकाळ११३४३.४५३६
मिरज३१००.८५७१
वाळवा२३८.८७७५
एकूण ८३३७१०४०

टंचाईवर ७ कोटी
पाणी टंचाई निवारणासाठी ८ कोटी ११ लाखाांचे अनुदान प्राप्त झाले असून, यामधील ७ कोटी ४१ लाख रुपये आतापर्यंत खर्च झाले आहेत. उपसा सिंचनाच्या आॅगस्टअखेर वीज बिल भरण्यासाठी ६ कोटींची आवश्यकता आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून राज्य शासनाला नुकताच पाठविण्यात आला आहे.

Web Title: 50% of the drought-filled areas are filled with ponds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.