शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

५.३३ कोटींचा अपहार; सांगली जिल्हा बँकेचे सात कर्मचारी सेवेमधून बडतर्फ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 13:06 IST

निलंबित १८ जणांवर ही लवकरच कारवाई

सांगली : जिल्हा बँकेच्या शासकीय निधीसह विविध निधीतील ५ कोटी ३३ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी शाखा अधिकाऱ्यांसह २५ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. यापैकी सात कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. तसेच उर्वरित १८ कर्मचाऱ्यांनाही लवकरच बडतर्फ करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली.जिल्हा बँकेच्या तासगाव, बसरगी, पलूस, नेलकरंजीसह विविध शाखांमध्ये २ कोटी ११ लाख ६० हजार ८२४ रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. बडतर्फ कर्मचाऱ्यांत इंद्रजित विठ्ठल वाघमारे (शाखा : बसरगी), योगेश सुरेश वजरीनकर, प्रमोद सुरेश कुंभार (शाखा मार्केट यार्ड, तासगाव), बाळासो नारायण सावंत (औद्योगिक वसाहत पलूस), प्रतिप गुलाब पवार, मच्छिंद्र गुंडा म्हारगुडे व दिंगबर पोपटी शिंदे (शाखा : नेलकरंजी) यांचा समावेश आहे.नैसर्गिक आपत्ती व अन्य कारणांसाठी शासनाकडून शेतकऱ्यांना भरपाई, अनुदान स्वरुपात मदत दिली जाते. जिल्हा बँकेत आठ ते दहा वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांची शासनाकडून आलेल्या मदतीची कोट्यवधी रुपयांची रक्कम पडून आहे. या रकमेत काही शाखांमध्ये कर्मचाऱ्यांनीच अपहार केल्याच्या घटना वर्षभरात सातत्याने उघडकीस आल्या. हा अपहार चार ते पाच वर्षांपूर्वी झाला आहे. मात्र बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सर्वच शाखांची अंतर्गत तपासणी मोहीम सुरु केल्याने हे घोटाळे उघडकीस आले.

आतापर्यंत ५.२२ कोटींचा अपहारशाखाधिकारी व लिपीक, काही ठिकाणी शिपाई यांनी संगनमताने शेतकऱ्यांच्या मदतीवर डल्ला मारला आहे. काही शाखांमध्ये बँकेच्या देणे व्याजात ही अपहार झाल्याचे आढळले आहे. जिल्हा बँकेच्या विविध शाखांमध्ये शासकीय मदत, अनुदान व देणे व्याज यामध्ये पाच कोटी २२ लाख रुपयांचा अपहार आतापर्यंत झाला आहे.

अपहारातील २.९० कोटी शासनाला भरलेजिल्हा बँकेच्या प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत २ कोटी ९० लाख रुपये वसूल केले आहेत. शासकीय अपहाराची सर्व रक्कम जिल्हा बँक प्रशासनाने वसूल करुन शासनाकडे परत भरली आहे. अपहार करणाऱ्या २५ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यापैकीच सात कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले असून १८ कर्मचाऱ्यांच्या बडतर्फची कारवाई चालू आहे.