कामेरीत मंगळवारी ५ जण कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:27 IST2021-04-21T04:27:10+5:302021-04-21T04:27:10+5:30

कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथे मंगळवारी ५ जणांचे अँटिजन रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे सध्या कामेरीत कोरोनाबाधित रुग्णसंख्या ...

5 corona affected in Kameri on Tuesday | कामेरीत मंगळवारी ५ जण कोरोनाबाधित

कामेरीत मंगळवारी ५ जण कोरोनाबाधित

कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथे मंगळवारी ५ जणांचे अँटिजन रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे सध्या कामेरीत कोरोनाबाधित रुग्णसंख्या ६२ झाली आहे. त्यापैकी एक मृत झाला असून, १५ जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर ४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी ४१ रुग्णांवर होम आयसोलेशनने उपचार सुरू आहेत. त्यामध्ये बहुतांशी सौम्य लक्षणे असणारे रुग्ण आहेत व ५ जण इस्लामपूर व कराड येथील कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत, अशी माहिती कामेरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन चिवटे यांनी दिली. नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचा वापर करावा व ४५ व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोरोना प्रतिबंध लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.

Web Title: 5 corona affected in Kameri on Tuesday