शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सांगली, मिरजेतील शासकीय रुग्णालयात चतुर्थश्रेणी कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 17:09 IST

अनुकंपाच्या चार जागा भरल्या, उर्वरित जागांचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया

सांगली : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या भेटीनंतर शासकीय रुग्णालयातील रिक्त पदे भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात अनुकंपा तत्वावरील चार जागा बुधवारी भरण्यात आली. उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. उर्वरित पदांसाठी आरक्षणाची बिंदुनामावली निश्चित करण्याचे काम सुरू आहे.शासकीय रुग्णालयात तब्बल ४५ टक्क्यांहून अधिक जागांवर मनुष्यबळच नसल्याचे आढळून आले आहे. त्या तुलनेत गेल्या काही वर्षांत रुग्णांचा ताण मात्र दुप्पटीने वाढला आहे. डॉक्टर्सपासून चतुर्थ श्रेणीपर्यंतच्या सर्वच जागांवर पुरेसे मनुष्यबळ नाही. एका विभागातील कर्मचारी दुसऱ्या विभागात नेमून रुग्णसेवा अखंडित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. वर्ग एक ते चारच्या ७३९ पैकी तब्बल ३१३ जागांवर कर्मचारी नाहीत. म्हणजे सुमारे ४५ टक्के जागा रिक्त आहेत. चतुर्थ श्रेणीमध्ये २३७ पैकी तब्बल १३५ पदे रिक्त आहेत. एकेका कर्मचाऱ्याला चार-चार वॉर्ड सांभाळावे लागत आहेत. १९९७ पासूनचे न्यायालयीन बदली कर्मचारी कायम नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.दरम्यान, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी गेल्या महिन्यात सांगली व मिरजेतील शासकीय रुग्णालयांना भेटी दिल्या होत्या. रिक्त जागांचा आढावा घेतला होता. त्या भरण्याची सूचना जिल्हाधिकारी व अधिष्ठात्यांना केली होती. चतुर्थश्रेणी पदे भरण्याचे अधिकारी जिल्हास्तरावर आहेत. त्यानुसार या जागा भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या जागांचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ती पूर्ण होताच जिल्हाधिकाऱ्यांकडून भरती प्रक्रियेस प्रारंभ होईल. कायम नियुक्त्यांसाठी न्यायालयात धाव घेतलेल्या जागांव्यतिरिक्त उर्वरित जागा जिल्हाधिकाऱ्यांकडून भरल्या जाणार आहेत.दरम्यान, पहिल्या टप्प्यात अनुकंपा तत्वावरील चार जागांवर उमेदवारांची नियुक्ती झाली आहे. बुधवारी त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. ही सर्व पदे चतुर्थश्रेणी दर्जाची आहेत.

परिचारिकांच्या तब्बल २७६ जागा रिक्तशासकीय रुग्णालयासाठी क वर्ग परिचारिकांची ३९९, तर ड वर्ग परिचारिकांची २३७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी अनुक्रमे २५८ व ९० पदांवरच परिचारिका काम करत आहेत. उर्वरित तब्बल २७६ जागा रिक्त आहेत. रजा, सुट्ट्या आदी सांभाळून परिचारिकांना रुग्णसेवा करावी लागत आहे. यातील क दर्जाची पदे, तसेच प्रथम व द्वितीय श्रेणीच्या रिक्त पदांवर भरतीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.

टॅग्स :Sangliसांगलीhospitalहॉस्पिटल