सांगली, मिरजेसह पुण्यातील ४९ डॉक्टर्स अखेर साताऱ्यातून मुक्त;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:32 IST2021-09-17T04:32:35+5:302021-09-17T04:32:35+5:30

सांगली : सांगली व मिरजेतून साताऱ्याला नियुक्त केलेल्या सर्व डॉक्टरांना गुरुवारी मुक्त करण्यात आले. त्यांना पुन्हा सांगली व मिरज ...

49 doctors from Sangli, Mirza and Pune finally released from Satara; | सांगली, मिरजेसह पुण्यातील ४९ डॉक्टर्स अखेर साताऱ्यातून मुक्त;

सांगली, मिरजेसह पुण्यातील ४९ डॉक्टर्स अखेर साताऱ्यातून मुक्त;

सांगली : सांगली व मिरजेतून साताऱ्याला नियुक्त केलेल्या सर्व डॉक्टरांना गुरुवारी मुक्त करण्यात आले. त्यांना पुन्हा सांगली व मिरज रुग्णालयात हजर होण्याचे आदेश सातारा शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय गायकवाड यांनी गुरुवारी दिले. यामुळे सांगली व मिरज शासकीय रुग्णालयांना दिलासा मिळाला आहे.

सातारा येथे नव्या शासकीय रुग्णालयासाठी सांगली, मिरजेतील ३७, पुण्यातून १६ व सोलापुरातून दोन डॉक्टर्स नियुक्त केले होते. मिरज शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय आणि सांगलीतील शासकीय रुग्णालयातून डॉक्टरांना साताऱ्याला पाठविल्याने जनमानसातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. आमदार सुधीर गाडगीळ यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना भेटून निवेदन दिले होते.

त्यानंतर आठवडाभरापूर्वी सर्व डॉक्टरांना मुक्त करण्यात आले. त्याबाबतचा लेखी आदेश साताऱ्याचे अधिष्ठाता डॉ. संजय गायकवाड यांनी आज (गुरुवारी) काढला. यामध्ये सांगली व मिरजेचे ३३, तर पुण्याचे १६ डॉक्टर आहेत.

राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने महिन्याभरापूर्वी सातारा रुग्णालयाचे परीक्षण केले. त्याचा अहवाल अद्याप मिळायचा आहे. यादरम्यान आठ डॉक्टरांनी काही दिवस साताऱ्यातच काम केले. इतरांनी परीक्षणापुरतीच हजेरी लावली. रुग्णालयाला मान्यता मिळाल्यावर प्रत्यक्ष कामासाठी डॉक्टर कोठून आणणार, हा प्रश्न तूर्त अनुत्तरीत आहे.

चौकट

सोलापूरचे डॉक्टर अद्याप साताऱ्यातच

दरम्यान, सोलापूरच्या वैशंपायन रुग्णालयातील दोघा डॉक्टरांना मात्र अद्याप साताऱ्यातून सोडलेले नाही. सातारा रुग्णालयात उपकरणे खरेदी, ग्रंथालय, यंत्रसामग्रीची तयारी यासाठी दोघांना साताऱ्यातच ठेवले आहे.

Web Title: 49 doctors from Sangli, Mirza and Pune finally released from Satara;