शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

कुपवाड एमआयडीसीत बोगस खत कारखान्यांवर छापे ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 1:29 AM

कुपवाड : कृषी विभागाच्या भरारी पथकाने कुपवाड एमआयडीसीतील मायक्रोलॅब व भाटिया भूमिपुतर ट्रेडको या दोन बोगस खत कारखान्यांवर छापा टाकून ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

ठळक मुद्देदोन विनापरवाना उत्पादकांवर भरारीपथकाची कारवाईखताचे नमुने तपासणीसाठी

कुपवाड : कृषी विभागाच्या भरारी पथकाने कुपवाड एमआयडीसीतील मायक्रोलॅब व भाटिया भूमिपुतर ट्रेडको या दोन बोगस खत कारखान्यांवर छापा टाकून ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. खतांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. याप्रकरणी मायक्रोलॅबचे संचालक साहील अरुण कोठारी आणि भूमिपुतर ट्रेडकोचे संचालक जसपाल सतपाल भाटिया यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस ही कारवाई करण्यात आली.

बोगस खतनिर्मिती रोखण्यासाठी राज्यभर कारवाई सुरू आहे. कुपवाड एमआयडीसीमधील काही कारखान्यांमध्ये विनापरवाना खतनिमिती सुरू असल्याच्या तक्रारी होत्या. साहिल कोठारी (रा. सांगली) यांचा मायक्रोलॅब (प्लॉट नं. जी १/ बी) हा खत निर्मितीचा कारखाना आहे. या कारखान्यात तीन वर्षांपासून सेंद्रीय खत निर्मिती, विक्री व साठवणूक केली जात होती. याबाबतची तक्रार आली होती. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास छापा टाकण्यात आला. कारखान्याकडे खत निर्मिती, विक्री व साठवणुकीचा परवाना नसल्याचे आढळून आले. तेथे सिलिकॉन खताच्या ५० किलोच्या २४० पिशव्या, मिश्र खताच्या १६० पिशव्या, सेंद्रीय दाणेदार खताच्या ४०९ पिशव्या, निम आॅरगॅनिकच्या ६५ पिशव्या, सेंद्रीय खताच्या २१० पिशव्या यासह दोन मालवाहतूक करणारी वाहने (ट्रक : क्र. एमएच ०४ सीए २६३४ आणि टेम्पो : क्र. एमएच १० एडब्ल्यू ७५८१) असा एकूण २० लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कंपनीतील खताचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.

एमआयडीसीत प्रणव अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजच्या आवारात भाड्याने घेतलेल्या गोदामात दोन वर्षांपासून जसपाल सतपाल भाटिया यांचा भाटिया भूमीपुतर ट्रेडको हा खत कारखाना सुरू आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता या कारखान्यात छापा टाकण्यात आला. येथे सँड सिलिकॉनपासून सिलिकॉनच्या विविध खतांची निर्मिती व साठवणूक केली जाते. मात्र, त्यांच्याकडे या खत उत्पादन आणि विक्रीला कोणत्याही प्रकारची प्रशासकीय मान्यता नसल्याचे आढळून आले. कृषी विभागाने तेथून सिलिकॉन व सेकंडरी खताची ३४८१ पोती (१६३.१७ टन) असा २७ लाख ८३ हजारांचा खताचा साठा जप्त केला. कारखान्यातील खतांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.

कारवाईत पुणे कृषी विभागाचे उपसंचालक के. बी. डेरे, तंत्र अधिकारी बी. सी. मोरे व किरण जाधव यांच्यासह जिल्हा कृषी विभागाचे विकास अधिकारी विवेक कुंभार, मोहीम अधिकारी डी. एम. पाटील, गुण नियंत्रण अधिकारी डी. एस. शिंगे यांच्यासह कुपवाड पोलिस ठाण्यातील हवालदार प्रवीण यादव, नितीन मोरे सहभागी झाले होते. याबाबत कुपवाड पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, पोलिस निरीक्षक अशोक कदम तपास करीत आहेत.कुपवाड एमआयडीसीतील भाटिया भूमिपुतर ट्रेडको खत कारखान्यावर छापा टाकण्यात आला. दुसºया छायाचित्रात मायक्रोलॅब कारखान्याची इमारत.