शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जमीन खरेदीच्या व्यवहारात ४८ लाखांची फसवणूक; सांगली, कोल्हापुरातील १८ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 12:36 IST

संशयितांनी यातील रक्कम कोल्हापुरात स्वीकारूनही त्यांनी जमीन व्यवहार पूर्ण केला नव्हता.

सांगली : कोदे (ता. गगनबावडा) येथे जमीन खरेदी करून देण्याच्या आमिषाने एकास ४८ लाख ६० हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी राजेंद्रप्रसाद गणपतराव जगदाळे (रा. पंढरपूर रोड, मिरज) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये दिलीप बाळकृष्ण नलवडे (रा. शंभरफुटी रोड, सांगली), विलास लखू कांबळे (रा. साखरी, ता. गगनबावडा), भिकाजी यशवंत पाटील (रा. तळे, ता. गगनबावडा), आनंदा राऊ पाटील, रखमाजी राणोजी पाटील, कृष्णात राणोजी पाटील, मारूती राणोजी पाटील, काशिनाथ सादू पाटील, नानूबाई शिवराम धाग, धोंडीराम शिवराम धाग, राजाराम शिवराम धाग, राजाराम शिवराम धाग, मारूती संतू माेहिते, ममताजी नागू पाटील, महादेव सदू माळी, सखाराम म्हाकू जानकर, ठकू धाकलू जानकर, राजाराम शिवराम धाग व सरदार दादू कोटकर (सर्व रा. कोदे, ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर) अशी संशयितांची नावे आहेत.२०१४ ते जुलै २०२० पर्यंत शहरातील कर्नाळ चौकीजवळील जानकी बिल्डिंग व शंभरफुटी रस्त्यावरील रॉयल आर्केड या इमारतीमध्ये असलेल्या कार्यालयात हा प्रकार घडला.फिर्यादी राजेंद्रप्रसाद जगदाळे व त्यांच्या मित्राकडून संशयितांनी कोदे बुद्रुक येथील जमीन व्यवहारापोटी ४८ लाख ६० हजार रुपयांची रक्कम घेतली होती. संशयित दिलीप नलवडे याच्या कर्नाळ पोलिस चौकीजवळ असलेल्या व रॉयल आर्केड येथील कार्यालयात रोख स्वरूपात तर काही रक्कम बँकेत ऑनलाइन पद्धतीने स्वीकारली होती. पैसे घेऊनही व्यवहार पूर्ण केला नाहीकोल्हापूर जिल्ह्यातील संशयितांनी यातील रक्कम कोल्हापुरात स्वीकारूनही त्यांनी जमीन व्यवहार पूर्ण केला नव्हता. याबाबत त्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही संशयिताकडून प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर जगदाळे यांनी शहर पोलिसांत सर्व संशयितांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी