विजयनगरमध्ये ४८ तासांत १८ कोरोनाबाधित सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:17 IST2021-07-09T04:17:35+5:302021-07-09T04:17:35+5:30

सांगली : विजयनगर (म्हैसाळ स्टेशन) येथे दोन दिवसात कोरोनाचे तब्बल १८ रुग्ण सापडले आहेत. कोरोनामुक्त झालेले विजयनगर यामुळे ...

In 48 hours, 18 corona were found in Vijayanagar | विजयनगरमध्ये ४८ तासांत १८ कोरोनाबाधित सापडले

विजयनगरमध्ये ४८ तासांत १८ कोरोनाबाधित सापडले

सांगली : विजयनगर (म्हैसाळ स्टेशन) येथे दोन दिवसात कोरोनाचे तब्बल १८ रुग्ण सापडले आहेत. कोरोनामुक्त झालेले विजयनगर यामुळे हॉटस्पॉट ठरले आहे. सर्व बाधितांना शाळेत संस्थात्मक विलगीकरणात ठेवले आहे.

बहुतांश स्थलांतरित मुजरांची वस्ती असणाऱ्या विजयनगरने गेल्या आठवड्यात कोरोनावर मात केली होती. आठ दिवसात कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडला नव्हता. त्यामुळे विजयनगर जणू कोरोनामुक्त झाले होते. बुधवारी एका वसाहतीत काही रहिवाशांना कोरोनाची लक्षणे दिसली. दक्षता समिती व आरोग्य यंत्रणेने संपूर्ण वसाहतीची तपासणी केली असता, १८ जण बाधित झाल्याचे निष्पन्न झाले. या सर्वांना लक्षणे नसल्याने शाळेत विलगीकरणात ठेवले आहे. वसाहतीतील काहीजण कार्यक्रम किंवा कामानिमित्त बाहेर गेले असता तेथे संसर्ग झाल्याचा अंदाज आहे.

विजयनगर कोरोनामुक्त झाल्याने शाळा व अन्य संस्था पुन्हा सुरु करण्याचे प्रयत्न सुरु होते, त्याला खो बसला आहे.

Web Title: In 48 hours, 18 corona were found in Vijayanagar