कामेरी आरोग्य केंद्राअंतर्गत ४६३ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:26 IST2021-05-19T04:26:39+5:302021-05-19T04:26:39+5:30
कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या कामेरीसह ६ गावात १८ मेअखेर ४६३ नागरिक कोरोनाबाधित झाले ...

कामेरी आरोग्य केंद्राअंतर्गत ४६३ रुग्ण
कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या कामेरीसह ६ गावात १८ मेअखेर ४६३ नागरिक कोरोनाबाधित झाले असून त्यापैकी ३१४ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. १९ अॅडमिट असून ११७ रुग्ण होमआयसोलेशनने उपचार घेत आहेत. १३ जणांचा मृत्यू झाला आहे, हा मृत्यू २.८० टक्के एवढा आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन चिवटे यांनी दिली.
कामेरी २४४ रुग्णांपैकी १५५ बरे झाले असून १३ अॅडमिट आहेत. ७१ रुग्ण घरी उपचार घेत आहेत. ५ मृत आहेत. येडेनिपाणी ८४ पैकी ७१ बरे १ अॅडमिट १० घरी उपचार घेत असून २ जण मृत झाले आहेत. तुजारपूर ७४ पैकी ५९ बरे झाले. २ अॅडमिट तर ९ घरी उपचार घेत असून ४ जणांचा मृत्यू झाला आहे. गाताडवाडी २७ पैकी ३ अॅडमिट असून २३ घरी उपचार घेत असून १ जण मृत आहे. विठ्ठलवाडी २४ पैकी १९ बरे झाले ४ घरी उपचार घेत असून १ जणांचा मृत्यू झाला आहे तर शिवपुरी येथे १० पैकी १० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्णसंख्या वाढत असली तरी ग्रामस्थांनी घाबरून न जाता सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अशी कोरोनाची लक्षणे असतील तर तत्काळ आरोग्य केंद्रात येऊन आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व लगेच उपचार सुरू करावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.