गणपती पेठेतून ४५ हजाराची बॅग लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:49 IST2021-03-04T04:49:12+5:302021-03-04T04:49:12+5:30

सांगली : गणपती पेठेतील माहेश्वरी पिशवी केंद्रासमोर चोरट्याने मोटरसायकलला अडकवलेली पिशवी घेऊन पोबारा केला. या पिशवीत ४५ हजार रुपयांची ...

45,000 bags of lamps from Ganpati Peth | गणपती पेठेतून ४५ हजाराची बॅग लंपास

गणपती पेठेतून ४५ हजाराची बॅग लंपास

सांगली : गणपती पेठेतील माहेश्वरी पिशवी केंद्रासमोर चोरट्याने मोटरसायकलला अडकवलेली पिशवी घेऊन पोबारा केला. या पिशवीत ४५ हजार रुपयांची रोकड होती. हा प्रकार सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घडला. याप्रकरणी प्रवीण शांतिलाल शहा (वय ५४, रा. गोपाळनगर, हरिपूर रोड) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

प्रवीण शहा हे विमा व पिग्मी एजंट म्हणून काम करतात. सोमवारी रात्री ते गणपती पेठेत पिग्मी गोळा करत होते. माहेश्वरी पिशवी केंद्रात ते पिग्मीचे पैसे आणण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी मोटरसायकलला बॅग अडकविली होती. त्यात ४५ हजाराची रोकड, १६ धनादेश व ३० पावत्या होत्या. चोरट्याने ही बॅग घेऊन पलायन केले. ते दुकानातून बाहेर आल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी त्यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

Web Title: 45,000 bags of lamps from Ganpati Peth