शिराळा तालुक्यात नवे ४५ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:33 IST2021-04-30T04:33:48+5:302021-04-30T04:33:48+5:30

शिराळा : शिराळा तालुक्यात बुधवारी नवीन ४५ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात १६७ चाचण्या करण्यात आल्या. ...

45 new patients in Shirala taluka | शिराळा तालुक्यात नवे ४५ रुग्ण

शिराळा तालुक्यात नवे ४५ रुग्ण

शिराळा : शिराळा तालुक्यात बुधवारी नवीन ४५ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

दिवसभरात १६७ चाचण्या करण्यात आल्या. तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. शिराळा उपजिल्हा रुग्णालयात ७५ रुग्ण दाखल केल्याने या रुग्णालयात सध्या एकही बेड उपलब्ध नाही.

बुधवारी फकीरवाडी येथे ९, करुंगली येथे ६, शिराळा व मांगले येथे प्रत्येकी ४, शिरशी येथे ३, आंबेवाडी, चिखली, कोकरूड, लादेवाडी, वाकुर्डे बुद्रुक येथे प्रत्येकी २, आरळा, चरण, इंगरूळ, मणदूर, निगडी, पाडळेवाडी, सावंतवाडी, शेडगेवाडी येथे प्रत्येकी (१) असे ४५ रुग्ण आढळून आले आहेत. सध्या तालुक्यात ५०८ रुग्ण उपचाराखाली आहेत. यामध्ये मिरज कोविड रुग्णालयात १, शिराळा कोविड सेंटरमध्ये १०, शिराळा कोविड रुग्णालयात ७५, कोकरूड कोविड रुग्णालयात २०, स्वस्तिक हॉस्पिटल येथे १४, दालमिया सेंटरमध्ये १ रुग्ण दाखल आहे, तर ३८७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. दुसऱ्या लाटेत आतापर्यंत सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: 45 new patients in Shirala taluka