जिल्ह्यातील असंघटित कामगारांना ४५ कोटींचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:29 IST2021-01-19T04:29:00+5:302021-01-19T04:29:00+5:30
इस्लामपूर : सांगली जिल्ह्यातील असंघटित कामगारांना विविध योजनांच्या माध्यमातून ४५ कोटी रुपयांचा लाभ मिळवून दिला आहे. असंघटित कामगारांच्या ...

जिल्ह्यातील असंघटित कामगारांना ४५ कोटींचा लाभ
इस्लामपूर : सांगली जिल्ह्यातील असंघटित कामगारांना विविध योजनांच्या माध्यमातून ४५ कोटी रुपयांचा लाभ मिळवून दिला आहे. असंघटित कामगारांच्या विविध मागण्यांचा राज्य सरकारच्या वतीने निश्चितपणे पाठपुरावा करू,अशी ग्वाही जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली.
इस्लामपूर येथे राजारामबापू पाटील यांच्या पुण्यतिथीनिमीत्त राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार संघटना व जयंत दारिद्र्य निर्मूलन अभिमानच्या संयुक्त विद्यमाने आयोजित असंघटित कामगार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आ. अमोल मिटकरी, आ. मानसिंगराव नाईक, युवा नेते प्रतीक पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, अतिरिक्त कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव, संयोजक, माजी नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी प्रमुख उपस्थित होते.
पाटील म्हणाले, असंघटित कामगारांच्या मुलांना वैद्यकीय शिक्षणास एक लाख, तर इंजिनिअरिंगसाठी ६० हजार रुपये तसेच घर बांधण्यास २ लाख रुपये मिळत आहेत. याचा लाभ जास्तीत-जास्त कामगारांपर्यंत पोहोचवा. राज्यातील असंघटित कामगारांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हा सेल सुरू केला आहे.
अतिरिक्त कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी कामगारांना २९ योजनांची सविस्तर माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, सुभाष सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले.
जिल्हा संघटक निवास गायकवाड यांनी स्वागत केले. अॅड. चिमण डांगे, अरुण कांबळे, संजय पाटील, खंडेराव जाधव, सुस्मिता जाधव, रोझा किणीकर, संदीप पाटील, शरद यादव, विक्रम धुमाळ,पांडुरंग भाेसले, रंगराव देशमुख, प्रकाश पवार, निवास जाधव, इलियास पिरजादे उपस्थित होते. तालुकाध्यक्ष सागर चव्हाण यांनी आभार मानले.
चौकट
यावेळी श्रीमती किरण कृष्णाजी खोत जक्राईवाडी यांना ५ लाख रुपये तर श्रीमती यशोदा तुकाराम रासकर येडेनिपाणी व महिपती मोरे भिलवडी यांना प्रत्येकी २ लाखांच्या धनादेशचे वाटप करण्यात आले. यावेळी २५ कामगारांना १० हजार किमतीचे सुरक्षा संच दिले जाणार आहेत. १० कामगारांना आरोग्य कार्डाचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. यावेळी १० कोरोना योध्दांचा सन्मानही करण्यात आला.
फोटो ओळी- १८०१२०२१-आयएसएलएम-इस्लामपूर कामगार न्यूज
इस्लामपूर येथे मृत बांधकाम कामगारांच्या पत्नीस २ लाखांचा धनादेश जयंत पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी आ. मानसिंग नाईक, आ. अमोल मिटकरी, प्रतीक पाटील, शैलेंद्र पोळ, अनिल गुरव, सुभाष सूर्यवंशी उपस्थित होते.