नेर्लेत उभारला ४४ फूट उंच भगवा ध्वज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:28 IST2021-09-26T04:28:03+5:302021-09-26T04:28:03+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांना वयाच्या बाराव्या वर्षी राजमुद्रा मिळाली, त्यामुळे ध्वजाचा पहिला टप्पा १२ फुटांवरती केलेला आहे. त्यानंतर ...

नेर्लेत उभारला ४४ फूट उंच भगवा ध्वज
छत्रपती शिवाजी महाराज यांना वयाच्या बाराव्या वर्षी राजमुद्रा मिळाली, त्यामुळे ध्वजाचा पहिला टप्पा १२ फुटांवरती केलेला आहे. त्यानंतर वयाच्या सतराव्या वर्षी महाराजांनी तोरणा किल्ला सर केला; त्यामुळे दुसरा टप्पा सतरा फुटांवरती केला आहे. वयाच्या ३५व्या वर्षी महाराजांनी तह करून आपले अस्तित्व टिकवले होते, म्हणून ३५ फुटांवर तिसरा टप्पा केला आहे. वयाच्या ४४ व्या वर्षी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला म्हणून या ध्वजाची उंची ४४ फूट ठेवली आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ होते. म्हणून ध्वजाभोवती अष्टकोनी बुरुज बांधणार आहे. बुरुजाची उंची सात फूट आहे. अठरा पगड जातींच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांनी हे स्वराज्य निर्माण केले आहे. म्हणून बुरुजाला दोन्ही बाजूंनी १८ पायऱ्या वरती चढण्यासाठी बांधण्यात येणार आहेत.
हा सर्वात मोठा ध्वज उभा करण्यासाठी शिवराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सूरज पाटील, सूरज विरकर, प्रकाश पाटील, अमित पाटील, अमोल औताडे, संतोष पाटील, सुधीर नाईक, प्रशांत पाटील, स्वप्निल पाटील आदींसह कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
फोटो ओळ : नेलेॅ (ता. वाळवा) येथे शिवराज्य प्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात आलेला ४४ फूट उंचीचा भगवा ध्वज उभारण्यात आला आहे.