जिल्ह्यात दोन दिवसात ४३९ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:17 IST2021-03-30T04:17:39+5:302021-03-30T04:17:39+5:30
सांगली : जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम असून, गेल्या दोन दिवसांत नवे ४३९ रुग्ण आढळून आले, तर सात जणांचा कोरोनामुळे ...

जिल्ह्यात दोन दिवसात ४३९ नवे रुग्ण
सांगली : जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम असून, गेल्या दोन दिवसांत नवे ४३९ रुग्ण आढळून आले, तर सात जणांचा कोरोनामुळे बळी गेला असून, १३४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. परजिल्ह्यातील २० रुग्णही उपचारासाठी दाखल झाले आहेत.
जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. रविवार व सोमवार या दोन दिवसात महापालिका क्षेत्रात सर्वाधिक १३६ नव्या रुग्णांची भर पडली. यात सांगलीत ८७, तर मिरजेतील ४९ रुग्णांचा समावेश आहे. जत २९, खानापूर व तासगाव तालुक्यात ४५, आटपाडीत ३३, कडेगाव ४१, पलूस १६, कवठेमहांकाळ १३, मिरज २४, शिराळा १२, तर वाळवा तालुक्यात ४५ नव्या रुग्णांची भर पडली आहे. कोल्हापूर ७, बेळगाव २, सोलापूर, सातारा येथील ३, अहमदनगर १, तर मुंबईतील २ रुग्ण जिल्ह्यात उपचारासाठी दाखल झाले आहेत.
दिवसभरात आटपाडी, पलूस, जत आणि वाळवा या तालुक्यातील ७ रुग्णांचा मृत्यू झाला, तर १३४ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या १५६ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या १५३७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असून, ३०२ रुग्णांवर कोविड सेंटरमध्ये उपचार केले जात आहेत.
चौकट
आतापर्यंतचे बाधित : ५११५२
कोरोनामुक्त झालेले : ४७४८६
उपचाराखालील रुग्ण : १९१४
आतापर्यंतचे मृत्यू : १७९२
चौकट
सोमवारी दिवसभरात
सांगली : ३५
मिरज : ११
आटपाडी : ११
कडेगाव : १४
खानापूर : २६
पलूस : ०५
तासगाव : २६
जत : २६
कवठेमहांकाळ : ०२
मिरज : ११
शिराळा : ०६
वाळवा : ३२
चौकट
रविवारी दिवसभरात
सांगली : ५२
मिरज : ३८
आटपाडी : २२
कडेगाव : २७
खानापूर : १९
पलूस : ११
तासगाव : १९
जत : ०३
कवठेमहांकाळ : ११
मिरज : १३
शिराळा : ०६
वाळवा : १३