शिराळा तालुक्यात ४३ नवीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:19 IST2021-06-18T04:19:36+5:302021-06-18T04:19:36+5:30

शिराळा : तालुक्यात गुरुवारी २७ गावांमध्ये ४३ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. दोन दिवसांत रुग्ण संख्या ...

43 new patients in Shirala taluka | शिराळा तालुक्यात ४३ नवीन रुग्ण

शिराळा तालुक्यात ४३ नवीन रुग्ण

शिराळा : तालुक्यात गुरुवारी २७ गावांमध्ये ४३ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. दोन दिवसांत रुग्ण संख्या कमी होत आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. शिराळा, मांगले, सांगाव, गिरजवडे, मणदूर, तडवळे, बिऊर, पाडळी हॉटस्पॉट गावे झाली आहेत.

मांगले १०, नाटोली ४, कणदूर, मानकरवाडी प्रत्येकी २, भाटशिरगाव ७, शिराळा एक यासह २७ गावात ४३ रुग्ण आढळून आले आहेत. एकूण ८४७ ऍक्टिव्ह रुग्ण असून, गृहविलगीकरण कक्षात ७५०, संस्था विलगीकरण कक्षात ७, उपजिल्हा रुग्णालय ४९ , कोकरूड ग्रामीण रुग्णालय २५, स्वस्तिक कोविड सेंटर ७, मिरज कोविड रुग्णालय ४, खासगी रुग्णालय ५ असे रुग्ण उपचार घेत आहेत.

Web Title: 43 new patients in Shirala taluka