सायबरकडे वर्षभरात ४३ तक्रारी दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:24 IST2021-03-14T04:24:57+5:302021-03-14T04:24:57+5:30
स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. गेल्या पाच वर्षांत ऑनलाईन गुन्ह्यांच्या प्रमाणात दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळेच ...

सायबरकडे वर्षभरात ४३ तक्रारी दाखल
स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. गेल्या पाच वर्षांत ऑनलाईन गुन्ह्यांच्या प्रमाणात दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळेच मुख्यालयात सर्व यंत्रणा असलेले स्वतंत्र पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात आले आहे. याठिकाणी तक्रारी दाखल करून घेण्याबरोबरच त्याचा निवाडाही करण्यात येतो. बँकेची माहिती घेत फसवणूक, सोशल मीडियाद्वारे बदनामी, त्यावरील माहितीचा गैरवापर यासह इतर गुन्ह्यांचा तपास येथे होतो.
चौकट
सायबरकडे दाखल तक्रारी
जानेवारी २
फेब्रुवारी २
मार्च ६
एप्रिल ४
मे १
जून २
जुलै ३
ऑगस्ट १
सप्टेंबर ३
ऑक्टोबर ५
नोव्हेंबर २
डिसेंबर ३
चौकट
सायबर पोलीस ठाण्याची स्थिती
एकूण मनुष्यबळ २०
अधिकारी १
कर्मचारी १९
तक्रारी दाखल झाल्या गतवर्षात ४३
तक्रारी अद्यापही पेंडिंग १२
चौकट
दाखल तक्रारींचे निकारण पूर्णच
सायबर पोलीस ठाण्याकडे दाखल तक्रारींपैकी सर्व निकाली निघाले आहेत, तर सध्या केवळ एकाचा तपास सुरू आहे. या तपासासाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक यंत्रणा सायबरकडे कार्यान्वित आहे.
चौकट
बँक फसवणुकीच्या अधिक तक्रारी
बँकेतून बोलत असल्याचे सांगत, एटीएमची माहिती, पासवर्ड घेऊन फसवणुकीच्या सर्वाधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातही आता एटीएम सेंटरमध्ये एटीएमची अदलाबदल करून फसवणुकीचे गुन्हे वाढले आहेत. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक व बदनामीचे गुन्हे वाढले आहेत.
कोट
सायबर पोलीस ठाण्याच्यावतीने दाखल झालेल्या तक्रारींचे निराकरण केले जाते. याशिवाय या पोलीस ठाण्यासह जिल्ह्यात दाखल केसेसला तांत्रिक तपास करण्यासाठी सर्व ती यंत्रणा पुरविली जाते.
संजय क्षीरसागर, सहा. पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे.