जिल्ह्यात कोरोनाचे ४२६ नवे रुग्ण; २३ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:31 IST2021-08-24T04:31:24+5:302021-08-24T04:31:24+5:30

सांगली : जिल्ह्यात सोमवारी ४२६ जणांना कोरोनाचे निदान झाले. मृत्यूच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना परजिल्ह्यातील पाच जणांसह जिल्ह्यातील ...

426 new corona patients in the district; 23 killed | जिल्ह्यात कोरोनाचे ४२६ नवे रुग्ण; २३ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात कोरोनाचे ४२६ नवे रुग्ण; २३ जणांचा मृत्यू

सांगली : जिल्ह्यात सोमवारी ४२६ जणांना कोरोनाचे निदान झाले. मृत्यूच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना परजिल्ह्यातील पाच जणांसह जिल्ह्यातील १८ जणांचा मृत्यू झाला. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून दिवसभरात ६५२ जण कोरोनामुक्त झाले.

जिल्ह्यातील मृत्युसंख्येत सोमवारी वाढ होत १८ जणांचा मृत्यू झाला. त्यात मिरज २, वाळवा व खानापूर तालुक्यात प्रत्येकी ३, कडेगाव, जत, तासगाव आणि मिरज तालुक्यातील प्रत्येकी २ आणि आटपाडी, शिराळा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.

आरोग्य विभागाने आरटीपीसीआर अंतर्गत ५ हजार १२० जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात २३२ जण बाधित आढळले तर रॅपिड अँटिजनच्या ६५६० जणांच्या नमुने तपासणीतून २०० जण पॉझिटिव्ह आढळले.

उपचार घेत असलेल्या ४३९८ जणांपैकी ६७० जणांची प्रकृती चिंताजनक आहे त्यातील ५६४ जण ऑक्सिजनवर तर १०६ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील ५ जणांचा मृत्यू झाला तर नवीन ६ जण उपचारासाठी दाखल झाले आहेत.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित १८९१००

उपचार घेत असलेले ४३९८

कोरोनामुक्त झालेले १७९७२२

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४९८०

सोमवारी दिवसभरात

सांगली २६

मिरज ९

आटपाडी ४५

कडेगाव ७

खानापूर ३४

पलूस ४

तासगाव ४९

जत १५

कवठेमहांकाळ ७०

मिरज तालुका १०३

शिराळा १२

वाळवा ५२

Web Title: 426 new corona patients in the district; 23 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.